घड्याळ्याच्या काट्यावर फिरणाऱ्या आपल्या आयुष्यात घर आणि करिअर यातला ताळमेळ हे एक मोठं आव्हान प्रत्येक स्त्रीच्या नजरेसमोर असतं. सामान्य स्त्रीच्या या कथेला सिनेअभिनेत्रींचाही अपवाद नाही. पप्पी दे पारूला या गाण्यातून प्रेक्षकांना भावलेली पारूही याच चक्रात अडकली आहे. घर आणि करिअर या दोघांमध्ये अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचीही तारांबळ उडाली आहे. निमित्त आहे मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड या चित्रपटाचे. वॉन्टेड – अनवॉन्टेडच्या या जगात घर आणि करिअरचा मेळ साधताना बऱ्याचदा वॉन्टेड अनवॉन्टेड कधी होते, हे आपले आपल्यालाही कळत नाही. असंच काहीसं मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड चित्रपटामध्ये स्मिताचे ही झाले आहे.
मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड चित्रपटात या मिसेसचे मिस्टर अनवॉन्टेड क्राइम पेट्रोल फेम राजेंद्र शिसतकर आहेत. दुहेरी कुटुंबाचे गणित मांडणारी ही कथा प्रकाश गावडे यांनी लिहिली असून दिग्दर्शक दिनेश अनंत आणि प्रकाश गावडे या जोडीने चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. एक ताजातवाना विषय आणि तितकीच ताजी स्मिता गोंदकर आणि राजेंद्र शिसतकर यांची ही ताजी जोडी चित्रपट निर्माते मितांग भूपेंद्र रावल यांनी आपल्यासमोर आणली आहे.
उर्वी एंटरप्रायजेस निर्मित आणि दिनेश अनंत दिग्दर्शित मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड हा चित्रपट येत्या २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दाखवलेल्या वॉन्टेड – अनवॉन्टेडच्या युध्दात विजय कोणाचा होतो, हे येत्या २३ सप्टेंबरला कळेलच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smitas balancing act work or family
First published on: 06-09-2016 at 16:27 IST