तैमुर दररोज डिझायनर कपडे घालत नाही- सोहा अली खान

कलाकार म्हणून तुमचे फोटो काढले जाणं हे तुमच्या कामाचाच एक भाग आहे

taimur, soha ali khan
तैमुर अली खान, सोहा अली खान

सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांना २९ सप्टेंबरला कन्यारत्न झाले. सध्या सोहाचा संपूर्ण वेळ हे तिचे पालनपोषण करण्यात जातो. एका टॅबलॉइडला दिलेल्या मुलाखतीत सोहाने तिच्या मुलीबद्दल अर्थात इनाया नौमी खेमूबद्दल भरभरून सांगितले. सोहा म्हणाली की, ‘माझा वेळेचे नियोजन काय असते हा प्रश्नच आता उरला नाही कारण माझा पूर्ण वेळ तिच्यासाठीच जातो.’

‘माझ्या कुटुंबात मी सर्वात लहान असल्यामुळे डायपर बदलण्याची मला कधी गरज लागली नाही. माझ्या देखभालीसाठी सबा होती आणि सबासाठी सैफ. पण मी कोणाला सांभाळले असे कधी झाले नाही. पण आता मला मुलगी आहे आणि ती साध्या साध्या गोष्टींसाठीही माझ्यावर अवलंबून असते ही गोष्ट जबाबदारी वाढवणारी आहे.’

सोहाने यावेळी तैमुर अली खानची प्रसारमाध्यमांमध्ये असणाऱ्या प्रसिद्धीबाबतही भाष्य केले. ती म्हणाली की, ‘मला माहितीये काही काळानंतर हे सगळं शांत होईल. तैमुर एक लहान मुलगा आहे आणि तो दररोज डिझायनर कपडे घालतो, त्यामुळे दरदिवशी त्याचे फोटो काढलेच गेले पाहिजे असेही काही नाही. एक कलाकार म्हणून तुमचे फोटो काढले जाणं हे तुमच्या कामाचाच एक भाग आहे. पण तुमचं मुल यासर्व गोष्टींना बांधील नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Soha ali khan taimur ali khan is a child and it is not like he is wearing designer clothes every day that he has to be clicked