बॉलीवूड अभिनेत्री आणि धक धक गर्ल माधुरी दीक्षितचे ओटीटी पदार्पण म्हणून चर्चेत असलेली वेबमालिका ‘द फेम गेम’ आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. बॉलीवूडमधील अनेक मोठे कलाकार सध्या ओटीटीवर वेगवेगळे प्रयोग करू पाहतायेत. माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला मराठी चित्रपट याआधी ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. मात्र अभिनेत्री म्हणून प्रत्यक्ष वेबमालिकेत काम करण्याची माधुरीची ही पहिलीच वेळ आहे. ‘द फेम गेम’ नावाने प्रदर्शित झालेल्या या वेबमालिकेत माधुरीने एका यशस्वी अभिनेत्रीचीच भूमिका साकारली आहे. या वेबमालिकेचे कथानक मात्र रहस्यकथेच्या धाटणीतील आहे. अत्यंत यशस्वी अशी शहरातील अभिनेत्री अचानक गायब होते. ती कुठे गेली, तिचे कोणी अपहरण केले आहे की तिच्यासोबत अन्य कुठली दुर्घटना घडली आहे, याची तिळमात्र कल्पना पोलिसांना नाही. तिचा कसून शोध घेतला जातो आहे. या शोधात पोलिसांना अनेक धागे मिळत जातात. ज्यातून या अभिनेत्रीच्या यशस्वी चेहऱ्यामागे दडलेला वेदनादायी भूतकाळ उलगडत जातो, असे काहीसे या मालिकेचे कथानक आहे. आठ भाग असलेल्या या वेबमालिकेचे दिग्दर्शन विजय नाम्बियार आणि करिश्मा कोहली यांनी केले आहे. माधुरी दीक्षितची मुख्य भूमिका हे अर्थातच प्रेक्षकांना या वेबमालिकेपर्यंत आणणारे खरे कारण आहे. आत्तापर्यंत रवीना टंडन आणि सुश्मिता सेन यांचे ओटीटीवरचे पदार्पण यशस्वी ठरले आहे. माधुरीचा ‘द फेम गेम’ तिला अभिनेत्री म्हणून ओटीटीवरही फेम मिळवून देणार का, याचे उत्तर या वेबमालिकेतून मिळणार आहे.

कलाकार – माधुरी दीक्षित, संजय कपूर, मानव कौल, राजश्री देशपांडे, मुस्कान जाफरी, लक्षवीर सिंग सरन, गगन अरोरा, सुहासिनी मुळय़े, शुभांगी लाटकर. कधी – प्रदर्शित झाली  

star pravah man dhaga dhaga jodte nava jogwa fame smita tambe entry
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘जोगवा’ फेम अभिनेत्री घेणार एन्ट्री, साकारणार ‘ही’ भूमिका, जाणून घ्या…
aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’

कुठे -नेटफ्लिक्स लव्ह हॉस्टेल

गेल्या दीड-दोन वर्षांच्या काळात अभिनेता विक्रांत मस्सी आणि अभिनेत्री सन्या मल्होत्रा हे ओटीटीवर अत्यंत परिचयाचे चेहरे झाले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या दोघांनीही ओटीटीवर स्वतंत्रपणे कित्येक चित्रपटांतून काम केले आहे. या दोघांचेही बहुतांशी छोटे-मोठे चित्रपट ओटीटीवरच प्रदर्शित झाले आणि त्या चित्रपटांना चांगला प्रतिसादही मिळाला आहे. आता या जोडीला एकत्र आणणारा ‘लव्ह हॉस्टेल’ हा चित्रपट झी ५ वर प्रदर्शित झाला आहे. या दोघांबरोबर आणखी एक कलाकार या चित्रपटात जोडला गेला आहे तो म्हणजे अभिनेता बॉबी देओल. बॉबी देओलही ‘आश्रम’ या वेबमालिकेमुळे ओटीटी प्रेक्षकांच्या परिचयाचा चेहरा झाला आहे. दोन प्रेमी जीवांची कथा यात दाखवण्यात आली आहे. दोघांच्याही प्रेमाला त्यांच्या घरच्यांचा कडाडून विरोध आहे. या विरोधाला न जुमानता आपली प्रेमकथा पूर्ण करण्यासाठी या जोडप्याची पळापळ सुरू होते. मात्र या दोघांची प्रेमकथा रंगू द्यायची नाहीच असा निर्धार केलेली त्यांची घरची मंडळी हात धुऊन त्यांच्या मागे लागली आहेत. सत्ता, पैसा आणि तत्त्वांचा रक्तरंजित खेळ या प्रेमकथेशी जोडला गेला आहे. या दोघांनाही धडा शिकवण्यासाठी बॉबी देओलने साकारलेल्या व्यक्तिरेखेला पाचारण केले जाते. निर्दयी अशी खलनायकी व्यक्तिरेखा बॉबी देओलने यात साकारली आहे. या रक्तरंजित खेळात ही प्रेमकथा जिवंत राहते की त्याची राख होते, याचे उत्तर ‘लव्ह हॉस्टेल’ या चित्रपटात मिळेल. या चित्रपटाची निर्मिती गौरी खान, मनीष मुंद्रा आणि गौरव वर्मा यांनी केली आहे, तर दिग्दर्शन शंकर रामन यांचे आहे.

कलाकार – विक्रांत मस्सी, सन्या मल्होत्रा, बॉबी देओल, इंद्रजीत सिंग, योगी सिन्हा, सिमरन रावल, राज अर्जुन, स्वरूपा घोष, योगेश तिवारी, अक्षय ओबेरॉय. कधी – प्रदर्शित झाली कुठे – झी ५