दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा लवकरच ‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षीने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले. हे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे ‘खानदानी शफाखाना’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असल्याचे सांगितले आहे. हा ट्रेलर शेअर करत ‘अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, अनु कपूर, वरुण शर्मा आणि रॅपर बादशाहच्या खानदानी शफाखाना चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे’ असे लिहिले होते.

खानदानी शफाखाना चित्रपटाचा ट्रेलर पाहता चित्रपटात एका अनोख्या पद्धतीने लैगिंक समस्येवर भाष्य करण्यात आले आहे. दरम्यान चित्रपटात अभिनेता वरुण सोनाक्षीच्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे. सोनाक्षीचा मामा खानदानी शफाखाना सोनाक्षीच्या नावावर करतो. त्यानंतर सोनाक्षी लैगिंक समस्यांवर औषधे विकण्यास सुरुवात करते. परंतु सामाजात कोणीही या समस्यांवर उघडपणे बोलण्यास तयार नसते. समाजाने या समस्यांवर उघडपणे बोलण्यासाठी सोनाक्षी प्रयत्न करताना दिसते.

सोनाक्षीने देखील तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर या चित्रपटाचा पोस्टर पोस्ट करत ट्रेलर प्रदर्शित झाला असल्याचे सांगितले.

या चित्रपटात रॅपर बादशाह देखील झळकणार असून त्याचे कोका हे गाणे ऐकू येत आहे. या गाण्यात सोनाक्षी अत्यंत ग्लॅमरल अंदाजात दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिल्पी दासगुप्ता करणार असून हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.