नुकताच प्रदर्शित झालेल्या बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ‘माय चॉईस’चा व्हिडिओची बॉलीवूडकर आणि इतरांकडून स्तुती होत असताना अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मात्र याच्याशी सहमत नाही. सोनाक्षीने दीपिकाच्या व्हिडिओचे कौतुक केलेच पण, महिलांच्या सशक्तीकरणासाठी यापेक्षा अधिक वेगळ्या प्रयत्नांची गरज असल्याचे सोनाक्षीचे म्हणणे आहे. मुंबईत एका ‘कार शो’च्या दरम्यान सोनाक्षी बोलत होती.
पाहाः दीपिका म्हणते, ‘इट इज माय चॉइस’
सोनाक्षी म्हणाली की, “मी हा व्हिडिओ अजून पाहिलेला नाही पण, याचा मूळ गाभा महिला सशक्तीकरण आहे. हा एक चांगला प्रयत्न आहे. मात्र, महिलांचे सशक्तीकरण केवळ ‘कपडे आणि सेक्स’च्या बाबतीतील स्वातंत्र्य यापर्यंतच मर्यादित नाही. तर, रोजगार आणि स्वावलंबनासारख्या महत्त्वाच्या बाजू देखील आहेत.” तसेच ज्या महिला स्वातंत्र्यापासून दूर आहेत, त्यांना आपण ज्या काळात आहोत त्याची जाणीव करून देऊन सशक्तीकरण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‘माय चॉईस’ हा नक्कीच एक चांगला पुढाकार आहे. पण, त्याची खरी गरज लक्षात घेऊन केवळ कपडे आणि सेक्सच्या बाबतीतील स्वातंत्र्य यामुद्दयांपर्यंत मर्यादित न राहता ज्यांना खऱया अर्थाने गरज आहे अशा समाजाच्या तळागळापर्यंत हा मुद्दा जाईल या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असेही सोनाक्षी पुढे म्हणाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha says having sex outside marriage is not empowerment
First published on: 01-04-2015 at 05:38 IST