बॉलिवूडची फॅशनिस्टा अशी ओळख असलेली सोनम कपूर ही तिच्या कपड्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. आपल्या सौंदर्याने आणि वेगवेगळ्या स्टाईल्सने ती नेहमीच चर्चेत असते.

पुरस्कार सोहळा असो किंवा कोणत्याही सिनेमाचे स्क्रिनींग एवढेच काय तर विमानतळावरही ती दिसली तरी तिची स्टाइल कधीही कमी झालेली नसते. सोशल मीडियावरही ती नेहमी सक्रीय असते. तिचे हेट लूक सोशल मीडियावर व्हायरलही होतात. सोनमने काहीही परिधान केले तरी ते चांगलेच दिसते.

आता हेच पाहा ना, तुम्ही आतापर्यंत डेनिम जीन्सचे टॉप, ड्रेस एवढेच काय तर जम्पसूटही पाहिले असतील. पण तुम्ही कधी डेनिमची साडी पाहिली आहे का? जर तुमचं उत्तर नाही असेल तर तुम्ही सोनमचे हे फोटो पाहिलेच पाहिजेत.

सोनमच्या या पेहरावाला डेनिस साडी म्हटले जाते. साडी आणि पॅन्टचा मेळ तिने आधीही घातला आहे. आतापर्यंत अनेक पार्टीमध्ये तिने असा लूक केला आहे. तिच्यावर हा पेहराव चांगला दिसतो.

सोनमच्या या फोटोमध्ये तिची ही अनोखी मनमोहक साडी सर्वांचेच लक्ष वेधून घेते. या डेनिस साडीची खासियत म्हणजे या साडीला पाठीमागे एक खिसाही आहे. साडीसोबतच डेनिम पॅन्ट आणि त्याला पाठीमागे खिसाही आहे. साडीसोबत ब्राऊन पट्टा आणि बूट तसेच सोनेरी कानातले आणि या पेहरावाला साजेशी केशभूषा यामुळे सोनम नक्कीच मादक दिसते यात काही शंका नाही. सोनमच्या या लूकचे श्रेय सोनमसोबतच डिझायनर मसबा गुप्ता, मिशो डिझाइन्स, मिनेराली स्टोर आणि सोनमची बहीण रेहा कपूरलाही जाते.