Sonu Nigam Kanad Song: प्रसिद्ध गाय सोनू निगमचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बेंगळुरूमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्याने सोनू निगमला कन्नडमध्ये गाणे गाण्याची मागणी केली. विद्यार्थ्याच्या या मागणीवर सोनू निगम संतापला. तो म्हणाला की, “म्हणूनच पहलगामसारख्या घटना घडतात.”

सोनू निगम हिंदी गाणे गात असताना एका विद्यार्थ्याने ‘कन्नड, कन्नड’ असे ओरडले आणि त्याने सोनू निगमकड कन्नडमध्ये गाणे गाण्याची मागणी केली. यावर सोनूने गाणे मध्येच थांबवले आणि म्हणाला, “मी माझ्या कारकिर्दीत अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत, परंतु मी गायलेली सर्वोत्तम गाणी कन्नडमध्ये आहेत. मी जेव्हा जेव्हा तुमच्या शहरात येतो तेव्हा मला खूप प्रेम आणि आदर मिळतो. मी जेव्हा जेव्हा कर्नाटकात शो करतो तेव्हा मी ते विशेष आदराने करतो. तुम्ही माझ्यावर कुटुंबीयांसारखे प्रेम केले आहे, पण जेव्हा माझ्या कारकिर्दीइतकेही वय नसलेले मूल असे वागते तेव्हा ते वाईट वाटते.”

विषेश म्हणजे, सोनू निगमने कन्नडमध्ये ‘मुंगारू मालेये’ आणि ‘निनिंदले’ सारखी हिट गाणी गायली आहेत.

यावर बोलताना सोनू निगम पुढे म्हणाला की, “या विचारसरणीमुळेच पहलगामसारख्या घटना घडतात. कृपया तुमच्या समोर कोण उभे आहे ते पहात जा. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो.”

यावेळी सोनू निगमने असेही म्हटले की, त्याला कर्नाटक आणि कन्नड भाषा खूप आवडते. त्याने सांगितले की, जेव्हा जेव्हा तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कार्यक्रम करतो आणि कोणी कन्नड गाणे गाण्याची मागणी करतो तेव्हा तो कन्नडमध्ये किमान एक ओळ तर नक्कीच गातो. “हे माझ्या प्रेमाचे आणि आदराचे लक्षण आहे. कृपया सभ्यपणे वागा.”

दरम्यान, यापूर्वी, अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे ऑटो चालकांकडून कन्नड भाषिक नसलेल्यांना त्रास देण्यात आला होता किंवा ज्या दुकानांचे साइनबोर्ड कन्नडमध्ये नव्हते त्यांना लक्ष्य करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहलगाम दहशतवादी हल्ला

जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाम खोऱ्यात २२ एप्रिल रोजी पाकिस्तानस्थित संघटनेच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ज्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत अनेक कडक पाऊले उचलली आहेत.