करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस घसरत चालली आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूद याने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याने गरीब विद्यार्थांसाठी आता एका स्कॉलरशिपची घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आपलं भविष्य हे कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ठरतं. आपल्या आर्थिक परिस्थितीशी त्याचा काहीही संबंध नसतो. ज्या गरीब विद्यार्थांना शिकण्याची इच्छा आहे पण आर्थिक टंचाईमुळे त्यांना शिकता येत नाही. अशा विद्यार्थांसाठी आम्ही एक स्कॉलरशीप सुरु करत आहोत. कारण विद्यार्थांच्या प्रगतीमध्येच देशाची प्रगती असते. स्कॉलशीप मिळवण्यासाठी scholarships@sonusood.me या इमेल आयडीवर मेल करा.” अशा आशयाचं ट्विट करुन सोनू सूदने या नव्या स्कॉलरशीपची घोषणा केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonu sood announces scholarship for students mppg
First published on: 13-09-2020 at 15:04 IST