बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत गरजूंची मदत करताना दिसतो. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद हा सध्या अनेकांसाठी सुपरहिरो बनला आहे. सध्या सोनू सूदने केलेले ट्वीट चर्चेत आहे. या ट्वीटमुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

सोनू सूदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. तो सध्या पंजाबमध्ये आहे. पंजाबच्या मातीविषयी बोलत त्याने फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा टीशर्ट परिधान केला आहे आणि पांढऱ्या रंगाचे बूट घातले आहेत. फोटो शेअर करत ‘मेरे पंजाब दी मिट्टी दी खुशबू’ या आशयाचे कॅप्शन त्याने दिले होते. पण या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे सोनू सूदला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

एका यूजरने सोनू सूदची खिल्ली उडवत ही माती नाही सर शेण आहे असे म्हटले होते. दुसऱ्या एका यूजरने, ‘सर, तुम्ही ज्याला माती समजत आहात खरं तर ते शेण आहे’ असे म्हटले आहे. अनेकांनी सोनू सूदच्या या फोटोवर कमेंट करत त्याची खिल्ली उडवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनू सूद लवकरच ‘पृथ्वीराज चौहान’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण चित्रपटात सोनू सूद कोणती भूमिका साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.