दाक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेता आणि चित्रपट निर्माता अक्कीनेनी नागार्जुनचा आज ६०वा वाढदिवस आहे. नागार्जुनचा जन्म २९ ऑगस्ट १९५९ रोजी चेन्नई येथे झाला. त्याने १९६७ साली बाल कलाकार म्हणून ‘सुदिदुन्डालु’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर नागार्जुन १९८६ रोजी ‘विक्रम’ या तेलुगू चित्रपटातून अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केले. हा चित्रपट बॉलिवूडमधील १९८३ साली प्रदर्शित झालेल्या ‘हिरो’ चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटातील भूमिकेनंतर नागार्जुनला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या.
१९९० साली नागार्जुनने ‘शिवा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘खुदा गवाह’, ‘द्रोही’, ‘अंगारे’, ‘जख्म’, ‘अग्नि वर्षा’ अणि ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटांमध्ये काम केले. आता नागार्जुन लवकरच पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. तो अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यासह ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात काम करणार आहे.
नागार्जुनने १९८४ मध्ये चित्रपट निर्माते डी. रामानायडू यांची मुलगी लक्ष्मी दग्गुबतीशी लग्न केले. लग्नानंतर त्यांना पुत्ररत्न झाला. मात्र नागार्जुन आणि लक्ष्मीचा संसार फार काळ टिकला नाही. १९९० मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर नागार्जुनने अभिनेत्री अमला अक्कीनेशी लग्न केले. १९९४ मध्ये नागार्जुन पुन्हा बाबा झाला.
एका चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान नागार्जुन आणि तब्बूची ओळख झाली होती. दरम्यान दोघे ही ऐकमेकांच्या प्रेमात पडले. नागार्जुन आणि तब्बूचे रिलेशनशीप जवळजवळ १० वर्षे सुरु असल्याचे म्हटले जात आहे. पण त्यावेळी नागार्जुन विवाहित होता. त्याने तब्बूला स्वत:च्या घराजवळ घर घेऊन दिले होते. नागार्जुनला तब्बूसोबतचे रिलेशन कायम ठेवायचे होते आणि पत्नीसोबत घटस्फोटही घ्यायचा नव्हता. मात्र तब्बूला हे मान्य नव्हते. काही दिवसांमध्ये दोघांच्या रिलेशनशीपमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर तब्बूने नागर्जुनमुळे लग्नच केले नाही अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.