‘प्रयणम’ या ब्लॉकबस्टर तेलगू चित्रपटात मोहन बाबुचा मुलगा मनोज मानचुसोबत काम केलेली पायल घोष ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री बॉलिवूडमधील आपल्या पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. संजय च्चेल यांच्या एका अनाम चित्रपटात ती वीर दासबरोबर काम करीत असून, हा एक विनोदी चित्रपट आहे.
या आधी पायलने ज्युनियर एनटीआरबरोबर केलेला ‘उसारावेल्ली’ चित्रपटानेदेखील बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी सर्वाधिक व्यवसाय करणारा चित्रपट म्हणून मान मिळवला आहे. याशिवाय ‘वर्षधारी’ या कन्नड चित्रपटात तिने मिथुनबरोबर काम केले आहे. पायल काम करत असलेल्या या बॉलिवूडपटाचे निर्माते ‘भोलेनाथ मुव्हिज’चे भरत पटेल असून, अनिल भोरा आणि जनक शहा हे सह-निर्माते आहेत. चित्रपटात ऋषी कपूर, परेश रावल, प्रेम चोप्रा, दिव्या सेठ, भारती आचरेकर, टिकू तलसानिया आणि अन्य कलाकारांच्या भूमिकादेखील आहेत. मुंबई आणि सुरतमध्ये चित्रीकरण करण्यात आलेल्या या चित्रपटाचे ७० टक्के शुटिंग पूर्ण झाले असून, या वर्षी तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2014 रोजी प्रकाशित
पायल घोष बॉलिवूडच्या वाटेवर
'प्रयणम' या ब्लॉकबस्टर तेलगू चित्रपटात मोहन बाबुचा मुलगा मनोज मानचुसोबत काम केलेली पायल घोष ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री बॉलिवूडमधील आपल्या पदार्पणासाठी सज्ज झाली आहे.
First published on: 04-02-2014 at 05:30 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South siren payal ghosh to make her debut with sanjay chhels film