अभिनेत्री श्रीदेवीची लहान मुलगी खुशी सध्या सोशल मिडीयावरील एका छायाचित्रामुळे चांगलीच चर्चेत आहे. खुशीचे तीन महिन्यांपूर्वीचे छायाचित्र अचानकपणे सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. काही दिवसांपूर्वी खुशीने पॉपस्टार जॅक गिलिन्स्कीच्या गालावर चुंबन देतानाचे स्वत:चे छायाचित्र इन्स्ट्राग्रामवर अपलोड केले होते. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असल्याचे खुशीने या छायाचित्राबरोबरील संदेशात म्हटले होते. त्यामुळे सध्या या छायाचित्रावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
दरम्यान, खुशीची मोठी बहीण जान्हवी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. मध्यंतरी सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम आणि अनुराग कश्यपच्या मुलीबरोबरचे जान्हवीचे छायाचित्रही अशाचप्रकारे व्हायरल झाले होते. या सगळ्यांचे पालक सध्या आपापल्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असले तरी या स्टारपुत्रांचा बॉलीवूड पदार्पणाचा मुहूर्त जवळ आला असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.