Video: दे दणादण… जान्हवी कपूरची धडाकेबाज बॅटिंग

चित्रपटाच्या सेटवर शूटिंग दरम्यान रंगला क्रिकेटचा खेळ

भारतात क्रिकेट हा बहुतांश लोकांचा आवडता खेळ आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत कोणीही सहजपणे क्रिकेट खेळताना दिसतं. बॉलिवूड स्टार्सदेखील बऱ्याचदा क्रिकेटचा आनंद लुटताना दिसतात. काही दिवसांपुर्वी बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता श्रीदेवीची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर हिचा शूटींगदरम्यान क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

विराटपाठोपाठ आणखी एक क्रिकेटपटू झाला बाबा; शेअर केला Photo

जान्हवी सध्या चंदिगडमध्ये ‘गूड लक जेरी’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या शूटिंगदरम्यान मिळालेल्या फावल्या वेळेत चित्रपटातील कलाकार आणि सहाय्यक यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. नामांकित फोटोग्राफर विरल भयानी याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी क्रिकेटचा आनंद लुटताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर ती धडाकेबाज बॅटिंग करतानाही दिसते आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, जान्हवीने पहिला चेंडू मिस केला होता. पण त्यानंतर पुढच्या तिन्ही चेंडूवर तिने दमदार फटके लगावले. तसेच, एक फटका मारल्यानंतर तर तिने उडया मारून आनंदही साजरा केला. पंजाब ड्रेस आणि थंडीपासून संरक्षण करणारं जॅकेट घालून क्रिकेट खेळतानाचा जान्हवीचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे. जान्हवीच्या चाहत्यांकडून या व्हिडीओला प्रचंड पसंती मिळाली असून हा व्हिडीओ खूपच व्हायरल होतो आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sridevi daughter sexy hot video janvi kapoor playing cricket on set of movie good luck jerry video goes viral vjb

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या