अभिनेता शाहरुख खान हा केवळ बॉलीवूडचा बादशहा नसून जगभरातील सर्वाधिक श्रीमंत कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. इतक्या मोठ्या आणि श्रीमंत अभिनेत्याला कोणी ‘घटिया’ टी शर्ट भेटवस्तू म्हणून देईल हे विचार केल्यास पटत नाही ना.. विशेष म्हणजे या भेटवस्तूला खुद्द किंग खानही नाकारू शकला नाही.
नुकतेच शाहरुखने ‘द रिंग’ चित्रपटाचे अॅम्सटरडॅममधील काम पूर्ण केले. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसोबत अनुष्का शर्मा पुन्हा एकदा रोमान्स करताना दिसणार आहे. चित्रपटातील या भागास अॅम्सटरडॅम फिल्म कंपनीच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आलेय. येथील काम संपताच सदर कंपनीने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला भेटस्वरुपात टी शर्ट दिले. सफेद रंगाचे हे टी शर्ट बघताना अगदी साधेच वाटते. पण त्यावर लिहण्यात आलेला मथळा हा असाधारण होता. या टी शर्टवर हिंदीत लिहलेले की, ‘मैंने अॅमस्टरडॅम में फिल्म बनाई और बदले में मुझे यह घटिया टी-शर्ट मिली’. न्यू अॅमस्टरडॅम कंपनीने भारतीय कलाकारांना आणि इम्तियाज अली यांचे समर्पण, उत्साह आणि सहयोगाकरिता आभार मानले. शाहरुख या भेटवस्तूला कधी विसरू शकेल असे वाटत नाही.
दरम्यान, ‘द रिंग’ या चित्रपटाद्वारे शाहरुख आणि इम्तियाज अली हे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. तर शाहरुख आणि अनुष्का ही जोडी तिस-यांदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. अनुष्काचा पहिला चित्रपट ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘जब तक है जान’ या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

When it rains umbrellas…

A photo posted by Shah Rukh Khan (@iamsrk) on

Trying a JordanMessi combo.

A video posted by Shah Rukh Khan (@iamsrk) on

“We cannot accomplish all that we need to do without working together” #srkinstagyaan

A video posted by Shah Rukh Khan (@iamsrk) on

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srk and imtiaz receive a ghatiya tee for filming in amsterdam
First published on: 24-09-2016 at 15:15 IST