बॉलिवूडमध्ये बादशहा, सुलतान आणि परफेक्टनीस हे त्रिसूत्रीकरण आपल्याला शाहरुख, सलमान आणि आमिर या खान मंडळीमध्ये पाहायला मिळते. एखाद्या चित्रपटाबाबतची उत्सुकता असो अथवा लोकप्रियतेबाबतची तुलना तिन्ही खान मंडळींचे नाव घेतल्याशिवाय बॉलिवूडची चर्चा कदाचित अधूरीच राहिल.  कॉफीच्या बहाण्याने करण आणि सलमान यांच्यात रंगलेल्या गप्पांमध्ये आमिर आणि शाहरुखचे नाव चर्चेत आल्याने एक खान दुसऱ्या दोन खान मंडळींना चर्चेत आणतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. करणने सलमानच्या मनाचा ठाव घेताना तीन प्रश्न विचारले. यामध्ये त्याने मित्र कसे बनवाने हे पुस्तक कोण वाचत असेल. नातेसंबंध कसे जपावे याचा आभ्यास कोण करत असेल आणि तोंडावर लगाम ठेवण्यासाठी कोणता अभिनेता पुस्तकातून टीप्स घेत असेल असे तीन प्रश्न करणने विचारले होते.

यावेळी सल्लूने मित्र कसे जमवावे हे पुस्तक शाहरुख नक्की वाचत असेल असे म्हटले. दुसऱ्या प्रश्नावर उत्तर देताना नातेसंबंध कसे जपावे हे माझ्याकडून शिकावे, अशा आशयाने स्वत:चे नाव घेतले. तर बॉलिवूडमध्ये कितीही गदारोळ झाला तर त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत कसे राहावे हे आमिरकडून शिकण्यासारखे असल्याचे तो म्हणाला. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात करणने खान बंधूची फिरकी घेतली. करणच्या फिरकीवर सडेतोड उत्तर देत सलमानेही आपली दबंगगिरी दाखवून दिली.

सकरण जोहरने आपला चाहता कलाकार शाहरुखसोबत कॉफी घेतल्यानंतर आपल्या बहुचर्चित कार्यक्रमाच्या १०० व्या भागात दबंग खानला निमंत्रण दिले होते. ‘कॉफी विथ करण’च्या पाचव्या सत्रात या कार्यक्रमाचे एकूण १०० भाग पूर्ण झाले. या भागात दबंग सलमान खान, भाऊ अरबाज आणि सोहेल खानसोबत सहभागी झाला होता. ‘कॉफी विथ करणच्या या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी होत असतात. करण पाहुण्या कलाकारांसोबत कॉफीच्या बहाण्याने अनेक गुपितांचा खुलासा करणारे खोचक प्रश्न त्यांना विचारत असतो. नेहमी प्रमाणेच या भागातदेखील सलमान खान काही खुलासे करणार आहे. सलमानने या कार्यक्रमात स्वत:विषयीचे धक्कादायक गुपित उलगडल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे.