एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ हा चित्रपट तुफान गाजला. केवळ भारतातच नाही तर परदेशातूनही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने वर्ल्ड वाइल १२०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘आरआरआर’ हा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपटांपैकी एक ठरला आहे. परंतु, या चित्रपटाची कथा समलैंगिक संबंधावर आधारित असल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. यावर आता चित्रपट दिग्दर्शक राजामौली यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘आरआरआर’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता राम चरण व ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. परंतु, त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध हे समलैंगिक असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी ट्वीट करत चित्रपटाची कथा समलिंगी असल्याचं म्हटलं होतं. यावर राजामौलींनी मुलाखतीदरम्यान भाष्य केलं आहे.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

हेही वाचा>> तेजस्विनी लोणारी घराबाहेर पडल्यानंतर अमृता धोंगडे ढसाढसा रडली, नेटकरी म्हणतात “एवढं बदनाम करुन…”

हेही वाचा>> Video: अभिमानास्पद! ‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा, ‘जय हिंद’ म्हणताच…

राजामौली म्हणाले, “सोशल मीडियावर अनेक जण वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलत आहेत, याचं मी निरिक्षण केलं आहे. परंतु, मी फक्त चित्रपटाबद्दल बोलेन. चित्रपट दिग्दर्शकाने जर या गोष्टी गांभीर्याने घेतल्या. कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावणार नाहीत, असा विचार केला. तर दिग्दर्शक चित्रपटाच्या कथेतील गोडवाच गमावून बसेल”.

हेही पाहा>> Photos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो

“लोक काय म्हणत आहेत, याकडे तुम्ही सतत लक्ष देणं गरजेचं नाही. चित्रपट बनवण्याची ही पद्धत नाहीये. दिग्दर्शक होण्याच्या नात्याने चित्रपटाच्या कथेला न्याय देणं ही माझी पहिली जबाबदारी आहे. बाकी सगळे त्यानंतर येतात. आजच्या काळात दोन चांगले मित्र एकमेंकाच्या खांद्यावर हात ठेवायलाही घाबरत आहेत. लोक काय विचार करतील ही चिंता त्यांना सतावत आहे. तुम्ही चांगले मित्र असाल, तर यात काहीच चुकीचं नाही. मैत्री दाखवण्यात काय चुकीचं आहे? हे मला कळत नाही”, असंही पुढे ते म्हणाले.