सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलंसुद्धा चाहत्यांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. त्यातही काही प्रसिद्ध कलाकारांच्या मुलांबद्दलच्या अनेक लहानसहान गोष्टी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. त्यातीलच एक सेलिब्रिटी किड म्हणजे सुहाना खान. बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिडचं पदार्पण होत आहे. त्यामुळे सुहाना बॉलिवूडमध्ये कधी डेब्यू करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र सुहानाने बॉलिवूड चित्रपटाऐवजी एका शॉर्टफिल्मची निवड केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सुहाना लवकरच एका शॉर्टफिल्ममध्ये झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सुहाना सध्या लंडनमध्ये शिकत असून सोबतच अभिनयाचे धडेदेखील घेत आहे. सुहानाचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार नाही असं यापूर्वी शाहरुखने सांगितलं होतं. मात्र सुहानाने एका शॉर्टफिल्मच्या माध्यमातून कलाविश्वामध्ये पदार्पण केल्याचं दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर सुहानाचा एक फोटो व्हायरल होत असून यात ती गाडीच्या पुढच्या सीटवर बसल्याचं दिसत आहे.
सुहानाचा व्हायरल होत असलेला फोटो तिच्या आगामी शॉर्टफिल्मचा आहे. या शॉर्टफिल्मची निर्मिती तिचा एक मित्र करत असून यात सुहाना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. “सुहानाच्या आगामी शॉर्ट फिल्ममधील एक सीन. हा बॉलिवूड चित्रपट नाही. ही शॉर्टफिल्म असून त्याची निर्मिती तिचाच एक मित्र करत आहे”, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. हा फोटो सुहानाच्या फॅन क्बल पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुहानाचा कॉलेजमधील असाच एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये सुहानाने ज्युलिएटची व्यक्तीरेखा साकारली होती. त्यामुळे तिच्यादेखील शाहरुखप्रमाणेच अभिनयाचे गुण असल्याचं दिसून येतं.