सध्या अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहेत. दरम्यान हे स्टारकिड्स सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. या यादीमध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप, सैफ अली खानचा मुलगा इब्राहम खान अशा अनेकांचा समावेश आहे. पण सध्या सोशल मीडियावर सुहाना खानने केलेल्या पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीमध्ये फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सुहाना तिची मैत्रीण आलिया छिब्बासोबत दिसत आहे. तिने दोघींचा फोटो शेअर करत त्यावर कॅप्शन दिले आहे.

या कॅप्शनमध्ये सुहानाने ‘मी उंच असल्यामुळे फोटोमध्ये माझं डोकं पूर्ण दिसत नाही’ असे म्हटले आहे. तिने या फोटोमध्ये निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून केस ओपन ठेवले आहेत. या लूकमध्ये सुहाना अतिशय सुंदर दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो चर्चेत आहे. यापूर्वी सुहानाने अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याच्या फोटोवर कमेंट केल्यामुळे चर्चेत होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suhana khan shared photo with friend says my heads cut off avb
First published on: 25-11-2020 at 19:26 IST