नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत जणू एक नवा अध्यायचं लिहला आहे. या चित्रपटाने केवळ भारतातचं नाही तर विदेशातही लोकांना याडं लावून टाकलयं. विशेष म्हणजे नागराजच्या या चित्रपटाची प्रशंसा केवळ प्रेक्षकचं नाही तर इतर दिग्दर्शकही करू लागले आहेत. नागराजने एक अशी चित्रकृती बनवली आहे की आता आपण काय काम करणार? असा प्रश्न दिग्दर्शकांना पडू लागलायं. खुद्द ‘किल्ला’ चित्रपटाचा दिग्दर्शक अविनाश अरुण आणि ‘शाळा’चा दिग्दर्शक सुजय डहाके यांनी तर चित्रपटाविषयी प्रशंसेचे पूलचं बांधले.
याविषयी बोलताना सुजय म्हणाला की, मला नागराजचा खूप राग येतोय. मी हा चित्रपट आता दुस-यांदा बघतोयं. मी गेल्या पाच वर्षात अशी कलाकृती पाहिलेली नाही. चित्रपट पाहताना मला असं वाटतं होत की जणू मी नागराजच्या डोळ्यांतूनचं चित्रपट पाहतोय. ‘सैराट’चं लिखाण हे तर पूर्णपणे दादागिरी आहे, असं मी नागराजला म्हणालो. आताच्या घडीतला नागराज हा उत्कृष्ट लेखक आहे. चित्रपटाचा शेवट उत्तमरित्या करणा-या चित्रपटांमध्ये नागराजच्या दोन्ही चित्रपटांचे नाव येईल. तर अविनाश म्हणाला की, ‘फॅण्ड्री’ हा माझ्यासाठी ज्वालामुखी होता तर ‘सैराट’ हा भूकंप आहे. केवळ महाराष्ट्रातील लोकांनी नाही तर संपूर्ण देशातील लोकांनी हा चित्रपट पाहणं खूप गरजेचं आहे. मला तर वाटतं लवकरात लवकर हा चित्रपट सरकारने टॅक्स फ्री करायला हवा.
‘सैराट’ आणि नागराजविषयी अविनाश आणि सुजय काय म्हणाले ते ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पाहा.