‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरीला चाहत्याकडून मिळाली खास भेट

अभिनेत्री गिरीजा प्रभूने मानले चाहत्यांचे आभार

कोणत्याही कलाकारासाठी चाहत्यांकडून मिळणारं भरभरुन प्रेम हीच कामाची पोचपावती असते. चाहत्यांच्या याच प्रेमामुळे नवं काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच काहीसा अनुभव सांगितला आहे तो अभिनेत्री गिरीजा प्रभूने. गिरीजा सध्या स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत गौरीची भूमिका साकारते आहे. या मालिकेतील जयदीप – गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. त्याचीच पोचपावती म्हणून गौरीच्या एका खास चाहत्याने गौरीला मालिकेतील फोटो आणि स्वलिखित एक पत्र भेट म्हणून दिलं.

सोशल मीडियाच्या काळात पत्र लिहिणं तसं मागे पडत चाललं आहे. चाहते कलाकारांना सोशल मीडियावरुनच आपली प्रतिक्रिया कळवत असतात. मात्र या चाहत्याने गौरी आणि मालिकेचं कौतुक करणारं पत्र पाठवत मालिकेविषयी असणारं प्रेम व्यक्त केलं. या अनोख्या गिफ्टने गौरीही भारावून गेली. प्रेक्षकांचं हे प्रेम असंच राहो अशी भावना तिने व्यक्त केली.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत सध्या गौरीने घर सोडलं आहे. गौरीला शोधण्याचे बरेच प्रयत्नही सुरु आहेत. गौरीचे चाहतेही सध्या तिला मालिकेत मिस करत आहेत. तिने लवकरात लवकर परत यावं अशी मागणीही करत आहेत. या पत्रातही तसा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sukh mhanje nakki kay asta fame girija prabhu got special gift from a fan ssv