महाराष्ट्रातला राजकीय गोंधळ आता कुठे शांत झाला असतानाच ‘आरे’चा वाद चिघळू लागला आहे. ‘मेट्रो ३’साठीचे (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड आरेतच होणार अशी भूमिका नव्या सरकारने घेतली आहे. मात्र, मुंबईच्या फुफ्फुसावर सरकारला घाव घालू देणार नाही, असे ठाम मत व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी ‘आरे वाचवा’ची हाक दिली आहे. तर दुसरीकडे अभिनेता सुमीत राघवन मात्र, आरे आंदोलकांच्या विरोधात आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ‘कारशेड वही बनेगा’ म्हणत ट्विट केले होते. यासगळ्यात आता त्याने पुन्हा एकदा पोस्ट शेअर करत अश्विनी भिडे यांना व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, मुंबई या पदावर रुजु झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : व्हिडीओ मलायकाचा, पण मागच्या काकांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा व्हिडीओ

सुमीतने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अब आएगा मजा. मला कायम असे वाटायचे की हा प्रोजेक्ट पूर्णत्वास जाताना तुम्ही तिथे असायला हव्यात आणि आता तुम्ही तिथेच आहात. यासोबत सुमीतनं #KarmaStrikesBack #CarShedWahiBanega हे हॅशटॅग वापरले आहेत. सुमीतची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

आणखी वाचा : “झाडाला मिठी मारण्यापेक्षा…”, पुन्हा एकदा सुमीत राघवनचे ट्वीट चर्चेत

पाहा व्हिडीओ –

‘जायका’ कंपंनीला पत्र..

मेट्रो ३ प्रकल्पाची उभारणी जायका (जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी) च्या निधीच्या माध्यमातून केली जात आहे. ‘जायका’च्या धोरणानुसार प्रकल्प राबविताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची शाश्वती संबंधित यंत्रणांना द्यावी लागते. असे असताना ‘मेट्रो ३’ प्रकल्पात मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरेवर कशाप्रकारे घाव घातला जात आहे. याकडे ‘जायका’चे लक्ष वेधण्यासाठी ‘वॉचडॉग फाऊंडेशन’चे विश्वस्त ग्रॉडफ्रे पिमेंटा यांनी ‘जायका’ला पत्र पाठविले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यादृष्टीने ‘जायका’ने यात लक्ष घालावे अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sumeet raghavan post for ashwini bhide on aarey carshed posting dcp
First published on: 13-07-2022 at 17:06 IST