सिनेजगत असो किंवा टेलिव्हिजन अनेक कलाकारांना दारू पिण्याची किंवा सिगारेट ओढण्याची सवय असते. पण असे असले तरी कलाकार शक्यतो कधीही कॅमेरासमोर सिगारेट ओढत नाहीत किंवा तसं कुणाला शूटही करू देत नाही. पण ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये साधी सरळ दिसणा-या सुमोनाला सिगारेट ओढण्याची सवय आहे.
अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती ही नववारी नेसून सिगारेट ओढताना कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शूटींग दरम्यान ब्रेकमध्ये ती सेटबाहेर उभी राहून सिगारेट ओढताना या व्हिडिओत दिसते. नुकतीचं ‘सैराट’ चित्रपटाची संपूर्ण टीम ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर गेली होती. त्यावेळच्या भागात सुमोनाने हीच नववारी परिधान केलेली होती. त्याच दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचे दिसून येत आहेत. (छाया सौजन्यः युट्यूब)
संग्रहित लेख, दिनांक 28th Jun 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: ‘द कपिल शर्मा शो’मधील सुमोना सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल
अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती ही नववारी नेसून सिगारेट ओढताना दिसली.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 28-06-2016 at 10:19 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sumona chakravarti caught smoking at the kapil sharma show