scorecardresearch

पाळीव श्वानाच्या मृत्यूमुळे सुमोना चक्रवर्तीवर कोसळला दु:खाचा डोंगर, म्हणाली..

सुमोनाला झालं दु:ख अनावर, म्हणाली…

अनेकदा आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोमुळे चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे सुमोना चक्रवर्ती. छोट्या पडद्यावरील द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातून नावारुपाला आलेली ही अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. मात्र, यावेळी तिची चर्चा कोणत्याही फोटो किंवा व्हिडीओमुळे होत नसून तिच्या पाळीव श्वानामुळे होत आहे. सुमोनाचा लाडक्या पाळीव श्वानाचा मृत्यू झाला असून ती प्रचंड दु:खात असल्याचं दिसून येत आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या सुमोनाने तिच्या पाळीव श्वानासोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने तिच्या श्वानाच्या फुटप्रिंटचा फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोत त्याच्यासमोर दिवा लावला आहे. तसंच त्याच्यासाठी एक भावनिक पोस्टदेखील लिहिली आहे.


“१२/५ वर्ष. तू माझ्या काळजाचा तुकडा माझ्या रुनीला माझ्यापासून हिसकावून घेतलंस.मला फार एकटं, असहाय्य आणि सुन्न झाल्यासारखं वाटतंय. माझं पहिलं बाळ. माझ्या कायम तुझ्यावर असंच प्रेम राहिल,” अशी पोस्ट सुमोनाने शेअर केली आहे.

दरम्यान, ही पोस्ट शेअर करत तिने रुनीसोबतचे काही थ्रोबॅक फोटोही शेअर केले आहेत. समोना अनेकदा तिच्या पाळीव श्वानांसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत होती. रुनी व्यतिरिक्त तिच्याकडे आणखी एक पाळीव श्वान आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sumona chakravarti shares emotional farewell note for pet dog rooney ssj

ताज्या बातम्या