सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिचं नवीन गाणं ‘मधुबन में राधिका’ वरून सोशल मीडियावर बराच वाद झाला होता. त्यानंतर आता सनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनीनं पहिल्यांदाच तिच्या सरोगसीचा हृदयद्रावक अनुभव शेअर केला. तीन मुलांची आई असलेल्या सनीच्या दोन मुलांची जन्म हा सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे. तर तिची मुलगी निशा हिला तिनं दत्तक घेतलं आहे.

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सनीनं सरोगसीचा हृदयद्रावक अनुभव सांगितला. यासाठी तिला किती दुःख आणि समस्यांचा सामना करावा लागला हे देखील तिनं यावेळी सांगितलं. या मुलाखतीत सनीनं सांगितलं की त्यांच्या सरोगसीसाठी जवळपास दीड ते दोन वर्षं लागली. त्यावेळी अशीही परिस्थितीही निर्माण झाली होती. सनी आणि तिचा पती डॅनिअल यांना बऱ्याच दुःखाचा सामना करावा लागला होता आणि त्यामुळे त्यांनी सरोगसीचा हट्ट सोडून निशाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता.

obsessed girlfriend with a love brain disease viral
Viral : तरुणीला झाला ‘प्रेमाचा’ आजार! प्रियकराला करायची १०० मेसेज! डॉक्टर म्हणाले, “हिला…”
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

सनी म्हणाली, ‘आमची सरोगसीची प्रक्रिया सुरू होती. ज्यासाठी बराच वेळ लागला. जवळपास दीड ते दोन वर्षांचा वेळ यासाठी गेला. जेव्हा ही प्रक्रिया आमच्या ठरलेल्या नियोजनानुसार होत नव्हती, तेव्हा आम्ही एक बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. सरोगसीसाठी आमच्याकडे सहा एग होते. ज्यापैकी ४ मुलींचे तर २ मुलांचे होते.’

सनी या मुलाखतीत पुढे म्हणाली, ‘अमेरिकेत तुम्हाला तुमच्या बाळाचं लिंग सांगितलं जातं आणि तुम्ही जेनेटिक टेस्टिंग करू शकता. पण हे भारतात होत नाही. त्यामुळे आम्ही आयव्हीएफ केलं. पण यात जे मुलींचे एग होते ते वाचले नाही. आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. त्यातून बाळाचा जन्म होणं शक्य नव्हतं. या वास्तवामुळे मी पूर्णपणे खचले होते.’

सनीनं या मुलाखती निशाला दत्तक घेण्याच्या अनुभवाबद्दलही सांगितलं. ती म्हणाली, ‘मी डॅनिअलसोबत मुंबईतील सेंट कॅथरीन होममध्ये गेले होते. हे एक अनाथआश्रम आहे. तिथे मुलांना पाहिल्यावर आमच्या मनात विचार आला की आपण एक मुल दत्तक घेतलं तर? आमचं त्याच्याशी जेनेटिकली नातं नसेलही, पण आमची मनं तर एकमेकांशी जोडलेली असतील. बराच विचार करुन आम्ही मुल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. बराच वेळ लागला. बरंच पेपरवर्क झालं. पण तेव्हाच आम्हाला समजलं की आयव्हीएफच्या मदतीनं आम्हाला दोन जुळी मुलं झाली आहेत. त्याच आठवड्यात आम्ही एका मुलीला दत्तक घेतलं होतं. हा सर्व देवाचा प्लान होता असं मला वाटतं.’