मी इतक्यात आई होण्याचा विचार करत नसल्याचे बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर बाळाचा विचार करत असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगली होती. मात्र, त्यामध्ये काही तथ्य नसून इतक्यात बाळाला जन्म देण्याचा माझा कोणताही विचार नसल्याचे सनीने सांगितले. मुंबईत मंगळवारी पार पडलेल्या सोनी गिल्ड पुरस्कार सोहळ्यादरम्यान तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तुम्हाला कोणी सांगितले की, मी बाळाला जन्म देण्याचा विचार करते आहे?, मी सध्या माझे वैवाहिक जीवन आनंदात जगत आहे. भविष्यात बाळाला जन्म देऊन कौटुंबिक जीवनाला सुरूवात करायला मला आवडेल. मात्र, सध्या मी गर्भवती नाही किंवा नजीकच्या काळात बाळाला जन्म देण्याचा माझा कोणताही विचार नसल्याचे सनी लिओनीने यावेळी स्पष्ट केले. काहीजण माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ का काढतात हे मला माहित नाही. बाळाला जन्म देण्याबाबत मी इतर स्त्रियांसारखाच विचार करते. मात्र, हे सगळे इतक्यात घडणार नसल्याचे सांगत सनीने प्रसारमाध्यमांतील बातम्यांविषयी नाराजी व्यक्त केली.
सनी लिओनी-डॅनियल वेबरच्या घरी हलणार पाळणा!
पाहा: ‘मस्तीजादे’तील सनी लिओनीचा बिकिनी लूक
आधीच लावणी, त्यात लिओनी?
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2015 रोजी प्रकाशित
मी इतक्यात आई होण्याच्या विचारात नाही- सनी लिओनी
काही दिवसांपूर्वी सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर बाळाचा विचार करत असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगली होती
Written by रोहित धामणस्कर

First published on: 23-12-2015 at 15:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone i am not pregnant and i am not having a baby anytime soon