सरकारने लॉकडाउनचा काळ येत्या ३ मे पर्यंत वाढवला आहे. कुठल्याही उद्योगावीना घरात बसून कंटाळलेल्या लोकांना अभिनेत्री सनी लिओनी आता डान्स करायला शिकवत आहे. तिने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील सनीच्या सिग्नेचर डान्स स्टेप शिकू शकता.
सनी लिओनीने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सनी ‘चपाती’ आणि ‘जिलेबी’ डान्स कसा करायचा ते चाहत्यांना शिकवत आहे. या अगदी सोप्या स्टेप्स पाहून तुम्ही देखील सनी प्रमाणे एक तरबेज डान्सर होऊ शकता असे सनीला वाटते.
सनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी तर सनीला आणखी असे व्हिडीओ तयार करण्याची विनंती केली आहे. कारण त्यांना सनी प्रमाणेच एक उत्तम डान्सर होण्याची इच्छा आहे.