अभिनेता सुशांतसिंह राजपूतनं दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पण वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी सुशांतनं या जगाचा निरोप घेतला. सुशांतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. सुशांतचा आज जन्मदिवस. बिहारमध्ये जन्मलेल्या सुशांतची एक आठवण कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीनं शेअर केली होती. हा किस्सा त्या वेळीचा आहे जेव्हा सुशांत, धोनीचा बायोपिक ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ची तयारी करत होता.

सुशांतसिंह राजपूतनं कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. पण जेव्हा तो या चित्रपटाची तयारी करत होता. त्यावेळी धोनी त्याला वैतागला होता. चित्रपट प्रमोशनच्या वेळी धोनीनं सुशांतचा हा किस्सा शेअर केला होता. सुशांत या चित्रपटाच्या तयारीसाठी धोनीला ३ वेळा भेटला होता. धोनीनं सांगितलं जेव्हा सुशांत त्याला पहिल्यांदा भेटला तेव्हा सुशांत खूप शांत होता. पण जेव्हा धोनी आणि सुशांत पुन्हा भेटले तेव्हा मात्र सुशांत एका मागोमाग एक प्रश्न विचारून हैराण केलं होतं. सुशांतच्या प्रश्नांमुळे धोनी अक्षरशः वैतागला होता.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत धोनी म्हणाला होता, ‘दुसऱ्या भेटीच्या वेळी सुशांत एका मागोमाग एक प्रश्न विचारत होता. ज्याची उत्तरं देऊन मी थकलो होतो. तो मला सारखा फॉलो करत होता. मी जिथे जाईन तिथे माझ्या मागे येत असे. मी त्याला एकदा बोललो देखील की तू खूप प्रश्न विचारतोस. पण मला त्याचं फार कौतुक वाटलं. आपल्या कामाप्रती तो खूप प्रामाणिक होता.’

सुशांतनं १४ जून २०२० रोजी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येवर बरेच प्रश्न उपस्थित केले गेले होते. एवढंच नाही तर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा देखील त्यावेळी बराच चर्चेत आला होता. याशिवाय त्याच्या कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनीही त्याच्या आत्महत्येवर संशय व्यक्त केला होता.