बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांचं काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झालं आहे. सुष्मितानं इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट लिहून चाहत्यांना रोहमनपासून वेगळं झाल्याची माहिती दिली होती. यावेळी आपल्या सोशल मीिडया पोस्टमध्ये ‘आमची मैत्री कायम राहील’ असं सुष्मितानं म्हटलं होतं. त्यानंतरही आता हे दोघंही एकत्र दिसले आहेत. सोशल मीडियावर सध्या या दोघांचे फोटो चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रेकअपनंतरही सुष्मिता आणि रोहमन यांच्यात चांगली मैत्री कायम आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमधून दिसून येतं. ब्रेकअपनंतर सुष्मिता आणि रोहमन एकत्र दिसले. पण यावेळी रोहमनच्या कृतीनं मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सुष्मिता आणि रोहमन एकाच गाडीतून जाताना दिसले. मात्र फोटोग्राफर्सना पाहून रोहमननं मात्र खाली झुकून स्वतःचा चेहरा लपवला. पण सुष्मिता मात्र हसून फोटोग्राफर्सना पोझ देताना दिसली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushmita sen and her ex boyfriend rohman shawl spotted together photos viral mrj
First published on: 04-02-2022 at 18:27 IST