Swapnil Joshi Viral Tweet: मराठी मनोरंजन सृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून स्वप्निल जोशीला ओळखले जाते. स्वप्निल जोशी सध्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत झळकत आहे. अनेकदा स्वप्नील जोशीच्या फॅन्सकडून त्याची शाहरुख खानसह तुलना केली जाते. अलीकडेच स्वप्नीलने शाहरुखच्याच पाऊलावर पाऊल ठेवून सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला. शाहरुखच्या #AskSRK प्रमाणे स्वप्नीलने सुद्धा #AskSJ असा हॅशटॅग पोस्ट केला होता. यावर चाहत्यांनी स्वप्नीलला अनेक प्रश्न विचारले व त्यानेही या प्रश्नांची परखड व प्रामाणिक उत्तरं दिली. यातील एका प्रश्नावर स्वप्नीलने आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे.

#AskSJ हॅशटॅगवर एका चाहतीने स्वप्नीलला विचारले की मराठी मनोरंजन सृष्टीत अशी एक कुठली (Actor or Actress) आहे ज्याच्यासह काम करायची आहे पण अजून योग आला नाही ? यावर स्वप्नील म्हणाला की, मला स्मिता पाटील यांच्या बरोबर एक फ्रेम तरी शेअर करायला मिळायला हवी होती ! ती सल कायम राहिल माझ्या मनात! कारण दुर्दैवाने या योग आता कधीच येणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वप्नील जोशी ट्वीट

दरम्यान, या सत्रात स्वप्नीलने तू तेव्हा तशी मालिकेवरून टोमणे मारणाऱ्या व टीका करणाऱ्या अनेकांना सुनावले आहे, स्वप्नीलला चांगल्या मालिका करत जा असा सल्ला देणाऱ्या एका युजरला उत्तर देताना त्याने चांगलं काय हे कोण ठरवणार! असा उलट प्रश्न केला होता. ज्यावर चाहत्याने प्रेक्षक ठरवतील पण एक चांगला अभिनेता म्हणून तुला अशा मालिकेत पाहायला आवडत नाही”, असे म्हटले. व स्वप्निल जोशीने ‘नोंद घेतलीय’ असे म्हटले आहे.