प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य दिग्दर्शित ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ या सिनेमाचा हृदयस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. गणेशचा हा दिग्दर्शनातला पहिला सिनेमा आहे. त्यामुळे हा सिनेमा नक्की कसा असेल याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. सिनेमाचे एक पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते . या पोस्टरमध्ये गणपतीच्या चित्राजवळ स्वप्नील झोपला आहे असे दाखवण्यात आले होते. त्यामुळे नक्की या सिनेमाची कथा असणार तरी काय हा प्रश्न अनेकांच्या मनात होता. आता या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे सिनेमाबद्दलच चित्र थोडं फार स्पष्ट झालं असं म्हणायला हरकत नाही.
‘रेहमानसोबत जे झालं ते खूपच उद्धटपणाचं होतं’
https://www.instagram.com/p/BWb41kUDiuq/
स्वप्नील यात एका श्रीमंत आणि नंतर एका भिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसत आहे. सिनेमासाठी आवश्यक असणारा अॅक्शन, ड्रामा, रोमान्स असा संपूर्ण मसाला या सिनेमात बघायला मिळणार हे ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं. आईची मनोभावे सेवा करणारा स्वप्नील यात दाखवण्यात आला आहे.
IIFA Awards 2017: ग्रीन कार्पेटवर कलाकारांचा जलवा
https://www.instagram.com/p/BWZNPiuAEGW/
येत्या ४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा हा सिनेमा आई आणि मुलाच्या भावनिक नात्यावर भाष्य करणारा आहे. या सिनेमाची कथा शशी यांची असून पटकथा, संवाद आणि गीत गुरु ठाकूर यांनी लिहिली आहे. आगामी ‘भिकारी’ या सिनेमात स्वप्नील जोशी, ऋचा इनामदार, गुरू ठाकूर आणि क्रिती अडारकर यांच्या मुख्य भूमिका असून सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा हे कलाकारदेखील आपापल्या भूमिकेतून प्रेक्षकाचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. गणेश आचार्य आणि शरद केळकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.