‘तारक मेहता…’ मालिकेतील दिशा वकानीला पूत्ररत्नाचा लाभ, दुसऱ्यांदा झाली आई

दिशाचा भाऊ मयूर वकानी याने याबाबतची माहिती दिली आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी तर घराघरात प्रसिद्ध ठरली. या मालिकेत दया बेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी ही दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिला पूत्ररत्नाचा लाभ झाला आहे. दिशाचा भाऊ मयूर वकानी याने याबाबतची माहिती दिली आहे.

मयूर वकानी याने एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, मला फार आनंद होत आहे कारण मी पुन्हा मामा झालो आहे. २०१७ मध्ये दिशाने मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर आता ती पुन्हा आई झाली आहे आणि मी मामा झालो आहे. मी फार खूश आहे, असे तो म्हणाला. विशेष म्हणजे मयूरने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दयाबेनचा भाऊ सुंदरलाल ही भूमिका साकरली आहे.

‘तारक मेहता…’ मालिकेत परतण्यासाठी दयाबेन सज्ज, निर्माते म्हणाले “आम्ही योग्य वेळेची…”

या मुलाखतीत मयूरने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत परतण्याबद्दलही भाष्य केले आहे. यावेळी तो म्हणाला, दिशा ही या शोमध्ये नक्कीच परतणार आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा हा असा एक शो आहे ज्यामध्ये तिने बराच काळ काम केले आहे. ती कधी परतेल आणि कधी काम सुरू करेल याची आम्ही वाट पाहत आहोत. दरम्यान मयूरप्रमाणे मालिकेचे निर्माते असित मोदी यांनीही दिशाच्या कमबॅकवर भाष्य केले होते.

साडी, चंद्रकोर अन् नाकात नथ; सचिन तेंडुलकरच्या लेकीचा मराठमोळ्या लूकमधील फोटो

दरम्यान २०१७ मध्ये दिशा मॅटरनिटी लीव्हवर गेली होती. तेव्हापासून ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले. यानंतर काही महिन्यांनी दिशाने मालिकेचा कायमचा निरोप घेतला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah actress disha vakani fame dayaben welcomes 2nd child blessed with a baby boy nrp

Next Story
…म्हणून अमृता फडणवीसांनी लावली ‘कान्स फिल्म फेस्टीव्हल’ला हजेरी; रेड कार्पेटवरील फोटोंसहीत समोर आलं उपस्थितीमागील कारण
फोटो गॅलरी