छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालाल, बबिता आणि दयाबेन या भूमिका साकारणारे कलाकार सतत चर्चेत असतात. सध्या जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी चर्चेत आहेत. त्यांची मुलगी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

दिलीप जोशी यांना एक मुलगी आहे. तिचे नाव नीयती जोशी आहे. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये तिचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकरांना या लग्नसोहळ्याचे आमंत्रण देण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

११ डिसेंबर रोजी नीयतीचे लग्न होणार आहे. ती एका एनआरआयशी लग्न करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विवाह सोहळा थाटामाटात पार पाडला जाणार आहे. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये त्यांनी लग्न सोहळा ठेवला आहे. दिलीप जोशी सर्व गोष्टींकडे स्वत: लक्ष देत आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेची संपूर्ण टीमला लग्न सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. दिशा वकानीला देखील आमंत्रण देण्यात आले आहे.