वूटवर नवीन वेब सीरिज सुरू झाली आहे. या वेब सीरिजचं नाव आहे ‘टाइम आऊट’. या वेब सीरिजमध्ये ताहिर राज भसीन आणि सरा जेन डायस यांच्या मुख्य भूमिका आहेत. ताहिरने ‘किस्मत लव्ह पैसा दिल्ली’ (२०१२) या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर तो ‘काय पो छे’ (२०१४) आणि ‘मर्दानी’ (२०१४) सिनेमातही झळकला होता. जेनने २००७ मध्ये ‘मिस इंडिया’ हा किताब जिंकला होता. जेनने ‘सुपर कूल है हम’ (२०१२), ‘जुबान’ (२०१६) या सिनेमांत काम केले आहे. तिने दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केले आहे. ब्रिटीश- इंडियन सिनेमा ‘व्हॉइसरॉय हाऊस’मध्येही दिसली होती.

https://www.instagram.com/p/BcB_mFWB7ok/

या वेबसीरिजबद्दल बोलताना ताहिरने सांगितले की, या सीरिजमध्ये एका जोडप्याची प्रेम कहाणी आहे. पण इतरांची प्रेम कथा लग्नावर संपते तिथे राहुल आणि राधा या दोघांची लग्नानंतर सुरू होते. लव्ह मॅरेज असूनही लग्नानंतर नेमकी काय होते हे या ‘टाइम आऊट’ सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/BcCOKDyBqlB/

सीरिज प्रेम कथेवर आधारित असल्यामुळे यात अनेक बोल्ड सीनही दाखवण्यात आले आहेत. बोल्ड सीन देताना मला संकोचल्यासारखे व्हायचे. पण जेनने मला सांभाळून घेतले. रोमॅण्टिक सीनपेक्षा मला जॉन अब्राहमसोबत अॅक्शन सीन करणं अधिक सोपं वाटत होतं.
‘टाइम आऊट’ सीरिजनंतर ताहिर नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘मंटो’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो शाम या प्रसिद्ध निर्मात्याची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या सिनेमात मंटो आणि शाम यांच्यातील जुगलबंदी पाहता येणार आहे.