scorecardresearch

Video : मराठीतलं आतापर्यंतचं बोल्ड गाणं पाहिलंत का?

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बोल्ड दृश्य आणि दुहेरी अर्थांच्या संवादाचा भरणा

धमाल कॉमेडी, बोल्ड दृश्य व दुहेरी अर्थांच्या संवादाचा भरणा असलेला ‘टकाटक’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिलिंद कवडे दिग्दर्शित या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहे. प्रथमेशसोबत रितिका श्रोत्रीचीही भूमिका आहे. त्याचबरोबर अभिनेता अभिजीत आमकर-प्रणाली भालेराव ही जोडीदेखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील एक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून मराठीतील हे आतापर्यंतचं सर्वांत बोल्ड गाणं असल्याचं म्हटलं जात आहे.

‘ये चंद्राला’ हे गाणं श्रुती राणेनं गायलं असून जय अत्रेंनी ते शब्दबद्ध केलं आहे. या गाण्यात अभिजीत आमकर व प्रणाली भालेराव रोमान्स करताना पाहायला मिळत आहेत. मराठीतील हे बोल्ड गाणं मानलं जात असून सोशल मीडियावर गाण्याची फार चर्चा आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अडल्ट कॉमेडी, हॉट सीन्स, किसिंग सीन्स दाखविण्यात आले आहेत. ट्रेलरमधील बोल्डपणा या गाण्यातही पाहायला मिळतो. पर्पल बुल एन्टरटेनमेंट प्रस्तुत टकाटक ह्या चित्रपटाची निर्मिती अजय ठाकूर, ओम प्रकाश भट, सुजय शंकरवार, रवी बहरी, इंदरजित सिंग, धनंजय मासूम आणि रबिंद्र चौबे यांनी केली आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर, उमेश बोलके आदी कलाकारही आहेत. येत्या 28 जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Takatak movie song ye chandrala boldest song in marathi prathamesh parab ritika shrotri abhijit amkar pranali bhalerao ssv

ताज्या बातम्या