प्रसिद्ध तरुण साऊंड डिझायनर आणि एडिटर निमिष छेडा याचे शनिवारी (१ मार्च) निधन झाले. गेल्या आठवड्यात अपघातात जखमी झालेल्या निमिषचे उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.
सुजय डहाकेच्या ‘शाळा’ आणि ‘आजोबा’, नागराज मंजुळेंच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रसिद्ध ‘फँड्री’ या चित्रपटासाठी निमिषने साऊंड डिझायनर म्हणून काम केले होते. आगामी ‘चौर्य’ या मराठी चित्रपटासाठीही त्याने साऊंड डिझायनिंग केले होते.
मराठीप्रमाणेच बॉलीवूडमध्येही कार्यरत असलेल्या निमिषने सावरिया, कमीने, जॉनी गद्दार, गो गोवा गॉन, नमस्ते लंडन या चित्रपटांसाठी त्याने साऊंड डिझायनर म्हणून काम केले होते. याशिवाय अनिल कपूरच्या ‘२४’ या मालिकेसाठीही त्याने साऊंड डिझायनिंगचे काम केले होते.  निमिषच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.