बॉलिवूड कलाकार हे कायमच चर्चेत असतात. त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियासारखी दिसणार एक मुलगी चर्चेत आहे. पण ही मुलगी नक्की कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तमन्ना सारखी दिसणारी झटलेखा मल्होत्रा ही देखील स्टार आहे. तिने २०१४मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. झटलेकाने संजय लीला भन्साली यांच्या प्रोडक्शन हाउसमधून पदार्पण केले आहे.

तमन्ना ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. काही दिवसांपूर्वी तमन्नाने चाहत्यांसोबत ब्युटी टीप्स शेअर केल्या होत्या. तिला आजवर चेहऱ्याला लावलेली विचित्र गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत तिने माची आणि अ‍ॅपल साईडर व्हिनेगरचा लेप लावला असल्याचे सांगितले. पुढे तमन्ना म्हणाली होती, “कदाचित हे तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असले, ऐकायला जरा विचित्र वाटतं असलं तरी सकाळीची लाळ मी लावली आहे. पण ती खरचं त्वचेसाठी गुणकारी असते.”

तमन्ना लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘बोले चुडिंया’ या सिनेमात झळकणार आहे. यासोबत ती तेलगू भाषात लवकरच येणाऱ्या ‘मास्टर शेफ’ या शोमध्ये होस्टच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamannaah bhatia lookalike is miss india international jhataleka malhotra avb
First published on: 07-08-2021 at 16:32 IST