दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक अतिशय धक्कादायक बातमी आली आहे. प्रसिद्ध तमिळ संगीतकार व अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. संगीतकार, अभिनेता आणि निर्माता विजय अँटोनीची मुलगी मीरा हिने आज १९ सप्टेंबरच्या पहाटे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का? रायगडमध्ये जन्मलेल्या नानांची कौटुंबीक व शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून थक्क व्हाल

रिपोर्ट्सनुसार, मीरा तिच्या चेन्नईमधील अलवरपेट येथील राहत्या घरी पहाटे ३ वाजता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. ती चेन्नईतील एका लोकप्रिय शाळेत शिकत होती. रिपोर्ट्सनुसार, ती तणावाखाली होती आणि त्यासाठी तिच्यावर उपचार सुरू होते. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलं आहे.

पालकांच्या विरोधात जाऊन १८ व्या वर्षी लग्न अन् वर्षभरात घटस्फोट; सुनिधी म्हणाली, “माझ्याकडून चुका झाल्या, पण…”

घरातील मदतनीसला मीरा तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, त्यानंतर तिला चेन्नईतील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी तिचा आधीच मृत्यू झाल्याचं सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय अँटोनी हे तमिळ चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. संगीतकार, अभिनेता व निर्माता विजयच्या पत्नीचं नाव फातिमा आहे. ती स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सांभाळते. विजय आणि फातिमा यांना मीरा आणि लारा नावाच्या दोन आहेत, त्यातील मीराने आत्महत्या केली आहे.