हिंदी मालिका विश्वात खळबळ माजवणारी टीआरपी रेटिंग समोर आली आहे. या आठवड्यात प्रेक्षकांनी त्यांना काय आवडतंय आणि काय नाही हे सांगितले. या रेटिंग्स पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण मालिका विश्वातील लोकप्रिय मालिका टीआरपी रेटिंगमध्ये मागे पडली आहे. ओरमॅक्स मीडियाने या आठवड्याची पॉवर रेटिंग जाहीर केली आहे. तर जाणून घेऊया या आठवड्यात कोणत्या हिंदी मालिका ठरल्या इतरांसाठी वरचढ आणि कोणत्या मालिका टीआरपी रेटिंगच्या रेसमध्ये पडल्या मागे.

अनुपमा :

ओरमॅक्स मीडियाच्या या आठवड्याच्या पॉवर रेटिंगमध्ये अनुपमा या मालिकेने ‘तारक मेहता का उलट चष्मा’ला मागे टाकून पहिले स्थान मिळवले आहे. या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवण्यात आला आहे. याचा चांगला फायदा या मालिकेला होत आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा :

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका टीआरपी रेटिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आली आहे. या मालिकेची जागा ‘अनुपमा’ने घेतली आहे. ही मालिका पहिल्या स्थानावरून घसरली असली तरीही तिला जास्त नुकसान झालेले नाही कारण अजूनही या मालिकेने टॉप ३ मालिकांमध्ये आपले स्थान बनवून ठेवले आहे.

दिल्लीच्या महिला आयोगाने घेतली प्राजक्ता कोळीच्या कार्याची दखल; महिला दिनी केला सन्मान

द कपिल शर्मा शो :

‘द कपिल शर्मा शो’ने या आठवड्यात टीआरपी रेटिंग्समध्ये तिसरे स्थान मिळवले आहे. या कार्यक्रमात प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे कलाकार आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येत असतात. ‘द कपिल शर्मा शो’ हा टीव्ही जगतातील प्रसिद्ध कार्यक्रमांपैकी एक आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है :

ओरमॅक्स मीडियाच्या या आठवड्याच्या पॉवर रेटिंगमध्ये ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेची रेटिंग पाहता असे दिसून येते की हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये बराच लोकप्रिय आहे.

कुंडली भाग्य :

कुंडली भाग्य या मालिकेने ओरमॅक्स मीडियाच्या या आठवड्याच्या पॉवर रेटिंगमध्ये पाचवे स्थान मिळवले आहे. ही मालिका सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे याचा पुरावा म्हणजे या मालिकेला मिळालेल्या रेटिंग्स.

बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावर तेजस्वी प्रकाशने केलं भाष्य; म्हणाली, “लोकांना…”

कुमकुम भाग्य :

या रेटिंग्समध्ये सहाव्या स्थानावर ‘कुमकुम भाग्य’ ही मालिका आहे. बऱ्याच काळापासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेची सध्याची कथा पाहता असे दिसून येते की ही मालिका येणाऱ्या काळात जबरदस्त ट्विस्टसह प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी तयार आहे.

नागिन :

ही मालिका सुरु झाल्यापासून सतत टॉप १० मालिकांच्या यादीमध्ये आपले स्थान बनवून आहे. ही या मालिकेसाठी चांगली गोष्ट आहे. लवकरच ही मालिका टॉप ५ मालिकांमध्ये असेल अशी आशा आहे. सध्या ही मालिका टीआरपी रेटिंग लिस्टमध्ये सातव्या स्थानावर आहे.

इमली :

या आठवड्यात ही मालिका टीआरपी रेटिंगमध्ये आठव्या स्थानावर आहे. मालिकेमध्ये येणारा ट्विस्ट आणि कथा यामुळे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरते आहे.

भाग्य लक्ष्मी :

या आठवड्यात ही मालिका टीआरपी रेटिंगच्या लिस्ट मध्ये नवव्या स्थानावर आहे. या मालिकेने टॉप १० मालिकांच्या यादीत आपले स्थान मिळवले आहे याचाच अर्थ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुम हैं किसी के प्यार में :

सई आणि विराट यांचा रुसवा फुगवा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यामुळेच ही मालिका ओरमॅक्स मीडियाच्या या आठवड्याच्या पॉवर रेटिंगमध्ये दहाव्या स्थानावर आहे.