ईद आणि सलमान खान याच्या चित्रपटांचं आता जणू समीकरणचं झालं आहे. दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमानचा एक तरी चित्रपट प्रदर्शित होतोच. काही दिवसांपूर्वीच त्याचा भारत हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आतापर्यंत १५९ .३० कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतीच २०१९ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या या यादीनुसार, पुन्हा एकदा विकी कौशलचा ‘उरी’ हा चित्रपट कमाईच्या बाबतीत सुपरहिट ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या यादीनुसार यावेळी कमाईच्या बाबतीत ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा प्रथम स्थानावर आहे. त्या खालोखाल ‘भारत’ दुसऱ्या स्थानावर, ‘केसरी’ तिसऱ्या स्थानावर , ‘टोटल धमाल’ चौथा क्रमांक आणि ‘गली बॉय’ पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ‘उरी’ हा यंदाच्या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा आणि तितकाच लोकप्रिय चित्रपट ठरला आहे.

दरम्यान, ‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. यामध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत. १९४७ सालच्या फ्लॅशबॅकमध्ये रंगविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये भारताचं होणारं विभाजन, त्या काळातील जनतेची परिस्थिती आणि साऱ्यामध्ये भारतचं खुलणारं प्रेम आणि त्याच्या जीवनाशी सुरु असलेला संघर्ष रंगविण्यात आला आहे. यामध्ये रोमान्स, कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन या सगळ्यांचा भरणा आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taran adarsh sharetop 5 highest grossing films 2019 releases ssj
First published on: 11-06-2019 at 18:51 IST