स्त्रीने आपल्यावरील अन्यायाचा बदला घेणा-या कथानकावर ‘जखमी औरत’ पासून ‘दामिनी’ पर्यंत बरेच चित्रपट आले, त्यात आता ‘तिसरा शब्द – द शॅडो ऑफ अ वुमन’ या चित्रपटाची भर पडत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे निर्माते अशोक तावडे हे महाराष्ट्रीय गृहस्थ असून आपले मित्र अशोक ठक्कर यांच्यासोबत या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे. संदीप सोलंकी या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत.
उत्तर भारतात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित हे चित्रपट रूप असून, स्त्रीयांबाबतचा आदर वाढावा या कारणास्तव या चित्रपटाची आपण निर्मिती केली असल्याचे अशोक तावडे यांचे मत आहे.
या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण गुजरातमध्ये झाले असून त्यामध्ये रेश्मा सिंग, विनीत रैना आणि जीत ठक्कर हे नवीन चेहरे आहेत. त्याशिवाय किशोर नांदलस्कर, अन्नू शाह, मनमौजी इतरांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाला संगीत वैष्णव देवा यांनी दिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jul 2013 रोजी प्रकाशित
स्त्री अत्याचार विरोधात मराठी निर्मात्याचा ‘तिसरा शब्द’
स्त्रीने आपल्यावरील अन्यायाचा बदला घेणा-या कथानकावर 'जखमी औरत' पासून 'दामिनी' पर्यंत बरेच चित्रपट आले, त्यात आता 'तिसरा शब्द - द शॅडो ऑफ अ वुमन' या चित्रपटाची भर पडत आहे.
First published on: 31-07-2013 at 01:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teesra shabda the shadow of a woman