गेल्या वर्षा अखेरीस म्हणजे ३१ डिसेंबर २०२३ रोजी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील आरोही म्हणजेच अभिनेत्री कौमुदी वलोकरने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. काही फोटो शेअर करत साखरपुडा केल्याची आनंदाची बातमी जाहीर केली होती. यामुळे कौमुदी चांगलीच चर्चेत आली होती. नुकताच अभिनेत्रीने साखरपुड्यातील खास क्षणाचा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

३१ डिसेंबर २०२३ला अभिनेत्री कौमुदी वलोकरने साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहिलं होतं, “या वर्षाच्या शेवटी आम्ही आमचा नवा अध्याय सुरू करत आहोत,” त्यानंतर साखरपुड्याच्या दोन महिन्यानंतर अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये साखरपुड्यातील खास आणि सुंदर क्षण पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – मुग्धा वैशंपायनला अंदमानच्या समुद्रात पाय बुडवण्याचा आवरला नाही मोह, म्हणाली, “गेली दोन वर्ष…”

या व्हिडीओची सुरुवात अभिनेत्रीच्या उखाण्यापासून होतं आहे. यावेळी कौमुदी भावुक झालेली दिसत आहे. उखाणा घेत कौमुदी म्हणते, ‘आई बाबांच्या संस्काराने अंगठी घालते प्रेमाची, आकाशचं नाव घेते वर्षाच्या शेवटी आणि आमच्या नात्याच्या पहिल्या दिवशी.’ मग या गोड उखाण्यानंतर गाणी गाताना, डान्स करताना सगळेजण पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या शेवटी कौमुदी-आकाश एकमेकांना अंगठी घातला पाहायला मिळत आहे. कौमुदीच्या साखरपुड्याचा हा सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ आता फुलणार, सागर मुक्तासाठी बनवणार खास पदार्थ

कौमुदीचा होणार नवरा कोण आहे? काय काम करतो?

कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे आहे. आकाशने याआधी इन्स्टाग्राम अकाऊंटच्या प्रोफाइलवर ‘आरोहीचा खरा यश’ असं लिहिलं होतं. पण आता त्याने प्रोफाइल बदललं आहे. आकाश हा उच्च शिक्षित आहे. त्याने एज्युकेशनमध्ये पीएचडी केली आहे. कौमुदीचा होणारा नवरा UC Berkeleyसाठी संशोधक म्हणून काम करतो. शिवाय ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशनसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतो. तसंच त्याची स्वतःची वेबसाइट आहे. ज्यावर त्याने अनेक ब्लॉग लिहिले आहेत.