scorecardresearch

Premium

‘आई कुठे काय करते’ फेम अनघाला मालिकेतील ‘या’ कलाकाराने दिलं हटके गिफ्ट! अभिनेत्री म्हणाली, “आणखी एक…”

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीला सेटवरच्या ‘या’ कलाकाराने दिलं गिफ्ट, फोटो शेअर करत म्हणाली…

aai kuthe kay karte fame ashwini mahangade aka anagha received special gift
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीला सेटवर दिलं खास गिफ्ट

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत तिने अनघाची भूमिका साकारली आहे. ही मालिका गेली चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यामुळे या मालिकेतील सगळ्या कलाकारांमध्ये एक वेगळंच बॉण्डिंग तयार झालं आहे. सध्या अनघाने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अश्विनी महांगडे म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अनघा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिला मालिकेतील एका सहकलाकाराने खास गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट कोणी दिलं? व ते नेमकं काय आहे? याची खास झलक अनघाने तिच्या पोस्टमध्ये दाखवली आहे.

tripti-dimri-bhool-bhulaiyya3
विद्या बालन पाठोपाठ ‘या’ अभिनेत्रीची झाली ‘भूल भूलैया ३’मध्ये एंट्री; कार्तिक आर्यनने पोस्ट करत दिली माहिती
snehal sidham in Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
वनिता खरात, प्रियदर्शनीनंतर शाहीद कपूरच्या चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी! म्हणाली, “कळवायला उशीर…”
Shilpa Shetty Kundra Champions of Change 2023 award shared photos videos
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ‘या’ पुरस्काराने गौरव; अभिनेत्री म्हणाली, “भारतीय म्हणून मला….”
Niharika Konidela reacts on her divorce
उदयपूरमध्ये शाही सोहळ्यात केलं लग्न, वर्षभरातच पतीपासून विभक्त झाली अभिनेत्री; म्हणाली, “मला किती त्रास झाला हे…”

हेही वाचा : “पहिल्यांदा जखम पाहिली तेव्हा…”, लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीची ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; म्हणाली, “माहेर अन् सासर…”

अश्विनीला ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कांचन आजी म्हणजेच अर्चना पाटकर यांनी चक्क गिफ्ट म्हणून पंखा दिला आहे. अभिनेत्री या लहानशा पंख्याचा फोटो शेअर करत लिहिते, “अर्चना पाटकर यांच्यामुळे आणखी एक फॅन माझ्या आयुष्यात आला आणि मी धन्य झाले. आजी खूप खूप धन्यवाद! माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट!”

हेही वाचा : करिअरच्या शिखरावर असताना माधुरी दीक्षितने श्रीराम नेनेशी लग्न करून अमेरिकेत स्थायिक होण्याचा का घेतला निर्णय? अभिनेत्री म्हणाली…

aai kuthe kay karte
अनघाला दिलं खास गिफ्ट

दरम्यान, अनघा आणि आजीचे मालिकेत ऑनस्क्रीन खटके उडत असले तरीही, प्रत्यक्षात दोघींमध्ये फार सुंदर नातं आहे. काही दिवसांपूर्वीचं अश्विनीने अर्चना पाटकर यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली होती. यात सेटवर तिची काळजी घेतल्याबद्दल अश्विनीने अर्चना यांचे आभार मानले होते. याशिवाय अनघाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ यांची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai kuthe kay karte fame ashwini mahangade aka anagha received special gift from co actor sva 00

First published on: 04-12-2023 at 11:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×