scorecardresearch

Premium

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील पुस्तकांचं दुकान पाहून ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेते गेले भारावून; म्हणाले, “दुर्दैवाने माझं वाचन…”

अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले, ” वाचनाची गोडी निर्माण करणं आवश्यक आहे.”

aai kuthe kay karte fame Milind Gawali his experience about mumbai-pune book shop
अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले, " वाचनाची गोडी निर्माण करणं आवश्यक आहे."

गेल्या कित्येक वर्षांपासून ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवत आहे. यामधील एक लोकप्रिय पात्र म्हणजे अनिरुद्ध. अभिनेते मिलिंद गवळी यांनी अनिरुद्ध हे पात्र उत्तमरित्या साकारल्यामुळे ते घराघरात पोहोचलं आहे. अभिनेते मिलिंद गवळी जितकं अनिरुद्ध पात्रामुळे चर्चेत असतात, तितकंच ते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे खूप चर्चेत असतात.

अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. विविध विषयांवर आपली मत मांडत असतात. तसेच दैनंदिन जीवनातले येणारे अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील असलेल्या पुस्तकांच्या दुकानाविषयी माहित देत आहेत. या व्हिडीओबरोबर अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांच्या वाचनाच्या अनुभवाविषयी सांगितलं.

divya agarwal and apurva padgaonkar
दिव्या अग्रवाल झाली मराठी कुटुंबाची सून, तिचा पती आहे प्रसिद्ध उद्योजक, तर ती अभिनयाशिवाय करते ‘हा’ व्यवसाय
Mahesh Manjrekar
कधी तरी मरू या भीतीमुळे आजचं जगणं कधीच थांबवू नये – महेश मांजरेकर
web series Purush
जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष’ या नाटकावर आधारित वेब मालिका येणार, ‘रानबाजार २’चीही घोषणा
gashmeer mahajani on father ravindra mahajani biopic
वडील रवींद्र महाजनींवरील बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार का? या प्रश्नावर गश्मीर म्हणाला, “सर्वकाही…”

हेही वाचा – “शिवाली हे खरंय?” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबची ‘ती’ पोस्ट पाहून चाहत्यांचे प्रश्न, म्हणाले, “निमिष…”

मिलिंद गवळी म्हणाले, “डिग्रीसाठी अभ्यास करत असताना अनेक ग्रंथालयांशी माझा संबंध आला, मुंबईतल्या अतिशय सुंदर सुंदर ग्रंथालयांमध्ये मला अभ्यास करायला मिळालं. त्यात आमच्या लाला लजपतराय कॉलेजच्या ग्रंथालयात मी भरपूर तास बसलो आहे. त्यानंतर बॉम्बे युनिव्हर्सिटीची फोर्टला असलेलं डेव्हिड ससून ग्रंथालय इथे बसून पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास केला. ब्रिटिश ग्रंथालयाला फिल्म्स बघायला मिळायचे म्हणून ब्रिटिश ग्रंथालय, अमेरिकन ग्रंथालय पण त्याच कारणासाठी जॉईन केलं. पण दुर्दैवानं माझं वाचन डिग्री मिळवण्यापुरताच सीमित होतं.”

“या सिनेमाच्या क्षेत्रात आल्यानंतर असंख्य महान लेखकांच्या सानिध्यात यायचा योग आला होता. जसे रत्नाकर मतकरी , कमलाकर नाडकर्णी, सुहास शिरवळकर इत्यादी. पण तेव्हाही मला वाचनाचे महत्त्व कळलं नाही. कलाकार ज्यांचं दांडगा वाचन आहे, जसे मकरंद अनासपुरे, अतुल परसुरे, आता सध्या ‘आई कुठे काय करते‘ या मालिकेत ओमकार गोवर्धन, या कलाकारांचा आणि यांच्यासारखे अनेक कलाकारांचा वाचन हे एक त्यांच्या जीवनाचा भाग आहे. आणि मला खरंच हेवा वाटतो या सगळ्याचा , कलाकार म्हणून ज्या ज्या वेळेला मी कमी पडतो, त्या त्या वेळेला मला जाणवत राहत की वाचन कमी पडलं , भाषेवर प्रभुत्व नाही. ही सतत जाणीव होत असते की शालेय जीवनापासून लहानपणापासून वाचनाची गोडी असणं किती आवश्यक आहे. खरंच ‘वाचाल तर च वाचाल’”

हेही वाचा – “हृदयाचे ठोके वाढतात, मूड बदलतो अन्…”, शिल्पा शेट्टीची बहीण शमिताला सुरू झाला ‘प्री-मेनोपॉज’चा त्रास, म्हणाली…

पुढे मिलिंद यांनी लिहीलं, “मला असं वाटतं यश मिळवण्यासाठी वाचन हे फार महत्त्वाचा आहे. आपल्या देशामध्ये अमिताभ बच्चन, धनुष, नाना पाटेकर, तर जगामध्ये बिल गेट्स, वरण बफेट, ओप्राविनफ्री, बराक ओबामा या सगळ्यांना वाचनाची अतिशय आवड आणि यांचं दांडगं वाचन आहे. याचाच अर्थ कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला यश मिळवायचं असेल, आयुष्य समृद्ध करायच असेल, वाचनाची गोडी निर्माण करणं आवश्यक आहे. खास करून लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करायलाच हवी आणि ती निर्माण करायची जबाबदारी आपलीच आहे. काही गोष्टी मला आयुष्यामध्ये खूप उशिरा कळल्या. पण ठीक आहे ‘देर आये दुरुस्त आये’”

दरम्यान, मिलिंद गवळी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी बऱ्याच मराठीसह हिंदी चित्रपटात काम केलं आहे. शिवाय ते अनेक हिंदी मालिकेतही झळकले आहेत. तसेच मिलिंद यांनी मल्याळम चित्रपटात देखील काम केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai kuthe kay karte fame milind gawali his experience about mumbai pune book shop pps

First published on: 24-11-2023 at 07:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×