Aarya Jadhao Called Suraj Chavan: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात निक्की तांबोळीला कानशिलात मारल्याने घरातून निष्कासित झालेली आर्या जाधव हिने सूरज चव्हाणला व्हिडीओ कॉल केला. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यात ती व तिची आई बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाणशी गप्पा मारताना दिसतात.

आर्या जाधवने आधी सूरजला फोन केला होता. त्यात आधी सूरज कोण पाहिजे असं तिला विचारतो. त्यानंतर आर्या म्हणते सूरज बोलतोय ना. मग तो होकार देतो. मग आर्या म्हणते, “अरे भावा, कुठे आहेस, कसा आहेस.” त्यावर “माझी बहीण मला कुठे सोडून गेली, काय माहीत” असं सूरज म्हणतो. त्यानंतर तुला सोडून कुठे जाणार असं आर्या म्हणाली. मग सूरज म्हणाला “तुला किती फोन केले.” त्यावर आर्याने सूरजची माफी मागितली. “सॉरी, नंबर ओळखीचा नव्हता त्यामुळे उचलला नाही,” असं ती म्हणाली.

आर्या जाधव व सूरज चव्हाणचं संभाषण (सौजन्य – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – जान्हवी किल्लेकर पोहोचली ‘गुलिगत’च्या गावी! सूरज चव्हाणची घेतली भेट, फोटो पाहून नेटकरी म्हणाले, “बहिणीचा दर्जा दिला…”

आर्या जाधवने नंतर सूरजला व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर त्यांनी गप्पा मारल्या.

आर्या जाधव व सूरज चव्हाण यांचा व्हिडीओ कॉल

आर्याची आईही सूरज चव्हाणबरोबर बोलली. सूरजला भावा-बहिणीचं नातं कायमस्वरुपी जपा असं म्हणाली. तसेच अमरावतीत तुझं हक्काचं घर आहे, त्यामुळे नक्की घरी ये, असं आर्याच्या आईने म्हटलं.

आर्या जाधवच्या आईने सूरजशी मारल्या गप्पा

दरम्यान, आर्या जाधव बिग बॉसमधील काही स्ट्राँग स्पर्धकांपैकी एक होती. मात्र एका टास्कदरम्यान तिचं व निक्की तांबोळीचं भांडण झालं. शाब्दिक वादानंतर संतापलेल्या आर्या जाधवने निक्कीच्या कानशिलात लगावली होती. बिग बॉसच्या घरातील महत्त्वाच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे तिला घरातून निष्कासित करण्यात आलं. त्यानंतर तिला बिग बॉस रियुनियन व ग्रँड फिनालेलादेखील बोलावण्यात आलं नाही.

हेही वाचा – तोच कल्ला अन् तोच थरार! Bigg Boss Marathi चा ग्रँड फिनाले पुन्हा रंगणार, नेटकरी म्हणाले, “केवळ हिंदीसाठी झुकलात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूरज चव्हाणबद्दल बोलायचं झाल्यास तो ७० दिवसांचा प्रवास पूर्ण करून या शोचा विजेता ठरला. नुकतीच जान्हवी किल्लेकर सूरजच्या गावी गेली होती. तिने मोढवे गावात जाऊन सूरज चव्हाणची भेट घेतली. तिने त्याच्या कुटुंबियांशी गप्पा मारल्या. तिचे फोटो व व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत.