झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नकारात्मक भूमिका साकारत आहेत. रुपाली राजाध्यक्ष हे त्यांचं मालिकेमधील पात्र प्रेक्षकांच्याही पसंतीस पडत आहे. मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. ऐश्वर्या नारकरने या वयाच्या पन्नाशीतही तितक्यात तरुण आणि फिटनेस फ्रीक दिसतात. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वयाबद्दल खुलासा केला आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांच्या सौंदर्याची भूरळ आजही लोकांना पडलेली असते. नुकतंच ऐश्वर्या नारकर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या वयाबद्दल मोठे भाष्य केले आहे. त्यावेळी त्या म्हणाल्या, “माझी पन्नाशी उलटलेली नाही. सोशल मीडियावर माझ्या वाढदिवसाची तारीख चुकीची टाकलेली आहे. त्यामुळे त्यात थोडा घोळ होतो.”
आणखी वाचा : Video : बाप तशी लेक! प्रियांका चोप्रा-निक जोनसच्या मुलीचा चेहरा अखेर दिसला, व्हिडीओ समोर

“माझ्या आजूबाजूला असलेले अनेकजण मला माझ्या वयाबद्दल विचारताना दिसतात. ते मला सारखं सांगत असतात की आपलं वय इतकं नाही. पण ठिक आहे. मी पन्नाशीच्या जवळपास पोहोचले आहे. तुम्ही वयाच्या कुठल्याही स्टेजला असला तरी फिटनेस हा आयुष्यात महत्त्वाचा असतो.

फिटनेस हा स्वत:ला प्रसन्न वाटावं, उत्साही वाटावं म्हणून करायचा असतो. फिटनेस हा आपल्या लाइफस्टाइलचा भाग असला पाहिजे. फक्त यावर्षीपासून करु हा संकल्प करण्यापेक्षा तो नियमित करायला हवा. मी वयाच्या १५ व्या वर्षापासून योगा करतेय. पण आता आता ते लोकांसमोर मी आणायला लागले”, असे ऐश्वर्या नारकर यांनी सांगितले.

आणखी वाचा : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मी जिंकलो असं…” अक्षय केळकरने उघड केले गुपित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐश्वर्या नारकर हे मराठी मालिका, नाटक, सिनेमामधील एक मोठं नाव आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. त्या अनेकदा आपले पती अविनाश नारकर आणि मुलगा अमेय नारकर यांच्यासोबत रील्स सुद्धा शेअर करत असतात. तसेच त्या सोशल मीडियावर त्यांच्या फिटनेसचे व्हिडीओही शेअर करताना दिसतात. सध्या त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत काम करत आहेत.