मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात ती रनरअप ठरली होती. अपूर्वा नेमळेकरने झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. अपूर्वा नेमळेकरने नुकतंच तिच्या भावाच्या आठवणीत एक भावूक पोस्ट केली आहे.

अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. अपूर्वाचा धाकटा भाऊ ओमकार नेमळेकर याचं गेल्या महिन्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. तो अवघ्या २८ वर्षांचा होता. त्याच्या निधनामुळे अपूर्वा आणि तिचे कुटुंबिय कोलमडले आहे.
आणखी वाचा : “तुला गमावणं ही सर्वात कठीण गोष्ट”, अपूर्वा नेमळेकरच्या भावाचे निधन; म्हणाली “तुझे हृदय…”

अपूर्वाचा धाकटा भाऊ ओमकार नेमळेकरचे १५ एप्रिलला निधन झाले होते. त्याच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात तिने एक त्याच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

“तुला जाऊन आज बरोबर एक महिना झाला. तुझी खूप आठवण येते भावा”, असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे. या कॅप्शनबरोबर तिने हार्ट ब्रेकचा इमोजीही शेअर केला आहे.

apurva nemlekar
अपूर्वा नेमळेकरची पोस्ट

आणखी वाचा : “माझ्या मोठ्या बहिणीसाठी प्रार्थना करा”, भावाच्या निधनानंतर अपूर्वा नेमळेकरची पोस्ट, म्हणाली “माझे जग उद्ध्वस्त…”

दरम्यान ओमकारच्या निधनानंतर अपूर्वा नेमळेकरने एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने “तुला गमावणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट आहे. तू माझ्या मनात, हृदयात कायमच असशील. माझ्या लहान भावा, आपण लवकरच भेटू. Rest in peace” असे म्हटले होते.