मराठी मालिका, वेबसीरिज, चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता फक्त इथवरच थांबली नाही तर तिने आता स्वतःचा व्यवसायही सुरू केला आहे. प्राजक्तराज हा तिचा नवा ज्वेलरी ब्रँड तिने लाँच केला आहे. एकाचवेळी अनेक कामांमध्ये प्राजक्ता व्यग्र आहे. शिवाय तिचा चाहतावर्गही तितकाच मोठा आहे.

आणखी वाचा – Video : “लग्न करणं गरजेचंच आहे का?” श्री श्री रविशंकर यांना प्राजक्ता माळीचा प्रश्न, उत्तर देत म्हणाले, “काही लोक लग्न करुनही…”

आता प्राजक्ताबरोबर एक घटना घडली आहे. प्राजक्ताचे सोशल मीडियावर बरेच फॅन पेज आहेत. त्यापैकीच फेसबुकवरील प्राजक्ताचं एक फॅनपेज हॅक करण्यात आलं आहे. याबाबत तिच्या चाहत्यांनी माहिती देताच प्राजक्ताने सोशल मीडिया अकाऊंटद्वारेा एक पोस्ट शेअर केली. तसेच सगळ्यांना एक विनंती केली आहे.

सर्वांना विनंती आहे की प्राजक्ता माळी – द क्वीन हे फॅनपेज हॅक करण्यात आलं आहे. कृपया अनफॉलो करा अशी पोस्ट प्राजक्ताच्या चाहत्यांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केली. ही पोस्ट पाहिल्यानंतर प्राजक्तानेही आपलं फॅनपेज फॉलो करणाऱ्यांसाठी एक पोस्ट शेअर करत माहिती सांगितली.

आणखी वाचा – “बायकोला पहिल्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं अन्…” ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राजक्ता म्हणाली, “हे माझं अकाऊंट नाही. या अकाऊंटला फॉलो करू नका. कारण हे अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे”. प्राजक्ताच्या या फॅनपेजचे फॉलोवर्स लाखोंच्या घरात आहेत. शिवाय ती सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. नुकतंच प्राजक्ताने श्री श्री रवि शंकर यांच्या आश्रमालाही भेट दिली. यादरम्यानचे काही फोटो व व्हिडीओही तिने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले.