मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर यांना ओळखले जाते. प्रार्थना ही उत्तम अभिनेत्री आहे. अनेक तरुणांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या प्रार्थनाने काही वर्षांपूर्वी निर्माता अभिषेक बरोबर लगीनगाठ बांधली. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा कामत हे पात्र साकारत आहे. नुकतंच प्रार्थना ही झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या हनिमूनचा किस्सा सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कार्यक्रमात प्रार्थनाला तिच्या हनिमूनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही हातावरची मेहंदी निघाल्यानंतरच हनिमूनला गेला होता हे खरं आहे का? असा प्रश्न यावेळी प्रार्थनाला विचारण्यात आला होता. त्यावर ती हसत हसत म्हणाली ‘हो हे एकदम खरं आहे.’
आणखी वाचा : “१ जूनला आम्ही ग्रुप बनवला अन् १४ दिवसांनी…” सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना प्रार्थना बेहरेने व्यक्त केली खंत

“माझं आणि अभिचं जेव्हा लग्न ठरलं, आमचं अरेन्ज मॅरेज होतं. त्याला ते अमूक पद्धतीने लग्न आणि इतर ठराविक गोष्टी करणं अजिबात आवडत नव्हतं. आमचं लग्नही २० मिनिटातच झालं होतं. सुरुवातीला तो अक्षता अगदी प्रेमाने टाकत होता. त्यानंतर काही वेळाने त्याला कंटाळा आल्यानंतर तो त्या फेकत होता. त्यावेळी मी त्याला सांगितलं अभि आपलं लग्न आहे, तुझंच लग्न आहे. लोक आपले फोटो काढतात, थोडासा नीट कर. त्यानंतर त्यांनी भटजींना सांगितलं की दहाव्या मिनिटाला हे विधी संपवा.

त्यानंतर आम्ही लग्नानंतर फिरायला जाण्यावरुन गप्पा मारत होतो. त्यावेळी त्याने मला विचारलं, ४० दिवसांनी हातावरची मेहंदी निघते का? मी त्याला हो म्हटलं आणि २० दिवसातच निघते असं सांगितलं. त्यानंतर तो म्हणाला ओके मग मी त्यानुसार फ्लाईटची तिकीट काढतो. मला ते हातावर मेहंदी, चुडा अशी टीपिकल तू मला नको आहेस.

त्यावर ती म्हणाली इतकंच असेल तर फ्लाईटची एक तिकीट इकडे आणि एक दुसऱ्या बाजूला अशी बुकींग कर. आपण असे बसून जाऊ. तो ते करायलाही तयार झाला होता. आपण टीपिकल हनिमून कपल वाटलं नाही पाहिजे. त्याला ते अजिबात आवडत नाही”, असा किस्सा प्रार्थना बेहरेने सांगितला.

आणखी वाचा : “अंकिताबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत…” प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

दरम्यान प्रार्थना बेहरने आणि अभिषेक जावकर यांनी १४ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अर्थशास्त्रात पदवीधर असलेल्या अभिषेकला परदेशात जाऊन एमबीए करण्याची इच्छा होती. पण, कॉलेजच्या दिवसांमध्ये इव्हेंट मॅनेजमेन्टसाठी काम करणाऱ्या अभिषेकला त्याच्या मित्राने चित्रपट निर्मिती क्षेत्रात गुंतवले. मूळ ‘सिंघम’ चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे. ‘यमुदू’, ‘गोलिमार’ आणि तेलगूमध्ये डब केलेल्या ‘हॅरी पॉटर’ सीरिजचे वितरणही अभिषेकनेच केले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress prarthana behere share honeymoon story how her husband abhishek jawkar book the ticket nrp
First published on: 16-10-2022 at 12:11 IST