अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील मराठी मनोरंजनसृष्टील लोकप्रिय जोडी आहे. सोशल मीडियावर दोघे नेहमी सक्रिय असतात. फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. काही वर्षं डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नाअगोदर एकमेकांचा स्वभाव जाणून घेण्यासाठी ते काही वर्षं लिव्ह इनमध्ये राहिले होते. नुकत्याच एका मुलाखतीत स्वप्नालीनं आस्तादच्या स्वभावाबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा- Video : अक्षराला घेऊन अधिपती चढणार जेजुरीचा गड, सुरू होणार मास्तरीण बाईंचा संसार, पाहा नवा प्रोमो

raghuram rajan
“भारतातील तरुणांची मानसिकता विराट कोहलीसारखी”, RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन असं का म्हणाले?
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

स्वप्नाली म्हणाली, सुरुवातीला आस्ताद माझ्या खूप डोक्यात जायचा. आस्तादला खूप माज होता आणि त्याच्या चेहऱ्यावर तो दिसून यायचा. पुढचं पाऊल या मालिकेच्या सेटवर आम्ही जास्त काळ एकत्र होतो. तेव्हा सगळे त्याला तो जाम माजोरडा आहे, असं म्हणत होते. पण, जोपर्यंत मी अनुभव घेत नाही तोपर्यंत मी कोणाबद्दल मत तयार करीत नाही. तो माज करायचा; पण आमचं जुळत गेलं. त्याच्या रागीट स्वभावामुळे एक पाऊल मागे ठेवूनच लोक त्याच्याशी बोलायला येतात.

स्वप्नाली पुढे म्हणाली, “आमचे वाद व्हायचे. कारण- तोही रागीट होता आणि मीही रागीट होते. ऑन सेटही आमचे वाद व्हायचे. पण अनेकदा तोच भांडणात माघार घ्यायचा. त्यामुळे लोकांना याला मी आवडते की काय? अशी शंका येऊ लागली होती. साधारण दोन महिन्यांतच आस्तादनं माझ्याजवळ त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. प,ण मी पूर्ण विचार करून माझा निर्णय त्याला कळवला. जवळपास दोन वर्षांनी मी माझा होकार आस्तादला दिला होता.”

हेही वाचा- Video : हास्यजत्रेच्या नायिका बॉलीवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफरसह थिरकल्या, ‘या’ व्हायरल गाण्यावर केला जबरदस्त डान्स

आस्ताद आणि स्वप्नालीची पहिल्यांदा भेट ‘पुढचं पाऊल’ मालिकेच्या सेटवर झाली होती. काही वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी सप्टेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. मराठी बिग बॉसमध्ये आस्तादनं पहिल्यांदा सगळ्यांसमोर स्वप्नालीवरचं प्रेम जाहीर केलं होतं. दोघांनी रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं होतं. लग्नातील दोघांच्या शाही लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.