Urvashi Dholakiya Car Accident : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती उर्वशी ढोलकिया हिचा अपघात झाला आहे. उर्वशीच्या गाडीला एका बसने जोरदार धडक दिली आहे. उर्वशी शूटींगसाठी जात असताना तिच्या गाडीचा अपघात झाला आहे. सुदैवाने यात उर्वशीला कोणतीही दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशी ढोलकिया ही तिच्या गाडीतून एका स्टुडिओमध्ये शूटींगसाठी जात होती. तिच्याबरोबर तिचा एक कर्मचारीही होता. यावेळी भरधाव येणाऱ्या एका शाळेच्या बसने उर्वशीच्या गाडीला मागून धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या अपघातातून उर्वशी ही थोडक्यात बचावली आहे. यानंतर उर्वशीला डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
आणखी वाचा : Video : सनी लिओनीचा चित्रपटाच्या सेटवर अपघात, रक्त पाहून अभिनेत्रीची झाली ‘अशी’ अवस्था

याप्रकरणी उर्वशीने कोणताही गुन्हा नोंदवण्याची गरज नसल्याचे म्हटलं आहे. “हा फक्त एक अपघात होता. मी सध्या ठिक आहे. काळजी करण्याची गरज नाही”, असे तिने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘बडे अच्छे लगते हैं २’ मालिकेच्या सेटवर मोठा अपघात, अभिनेत्री अलेफिया कपाडियाला गंभीर दुखापत

View this post on Instagram

A post shared by URVASHI (@urvashidholakia)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्वशीने तिच्या आयुष्यातील बराच काळ एकटीने घालवला आहे. उर्वशीने ‘कसौटी जिंदगी के’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यात तिने कोमोलिका हे पात्र साकारले होते. या पात्राद्वारे ती घराघरात पोहोचली. उर्वशीने वयाच्या १६ व्या वर्षी लग्न केले. त्यानंतर वर्षभरातच तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. पण तिचे हे लग्न जास्त काळ टिकले नाही. उर्वशी ही ‘नागिन ६’, ‘चंद्रकांता’ या मालिकेत झळकली होती.